जोतीषशास्त्रातले उपाय
Image Credit source: Social Media
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), ग्रह आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर खूप प्रभाव पडतो आणि कुंडलीतील त्यांची चांगली स्थिती तुमचे जीवन बदलू शकते. कारण ग्रह-नक्षत्रांची स्थिती खराब असेल तर व्यक्तीला विनाकारण त्रास सहन करावा लागतो. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात काही समस्या येत असतील आणि प्रत्येक गोष्टीत अपयश येत असेल तर काही उपाय खूप फायदेशीर ठरू शकतात. स्वयंपाकघरात ठेवलेली साखर तुमचे नशीब बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
काय आहे साखरेचा खास उपाय?
- नोकरी किंवा व्यवसायात नुकसान होत असेल तर काळजी करू नका. कारण स्वयंपाकघरात ठेवलेला साखरेचा डबा तुमचे नशीब बदलू शकतो. यासाठी प्रथम तांब्याचा पेला घेऊन त्यात साखर टाकून रात्रभर राहू द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही साखर विरघळवून प्या, त्यानंतर काही दिवसांत तुम्हाला बदल दिसेल.
- खूप वेळा मेहनत केल्यानंतर नशीब साथ देत नाही. अशा परिस्थितीत साखरेचा हा उपाय खूप प्रभावी ठरू शकतो. जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल तर आदल्या रात्री तांब्याच्या भांड्यात साखर आणि पाणी विरघळवून ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कामावर जाण्यापूर्वी ते पाणी प्या. ही युक्ती केल्याने तुमचे नशीब बदलेल.
- पितृदोषामुळे अनेकदा व्यक्तीला जीवनात समस्या आणि अपयशांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आपल्यासोबत पूर्वजांचे आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. पितृदोष दूर करण्यासाठी पिठाच्या भाकरीमध्ये साखर मिसळून कावळ्यांना खाऊ घाला. यामुळे पितृदोष संपेल आणि सर्व समस्या नष्ट होतील.
- जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा ग्रह दोष असेल आणि त्यामुळे तुमच्या कामात यश मिळत नसेल तर त्यासाठी सूर्यदेवाला जल अर्पण करा. लक्षात ठेवा की पाण्यात काही थोडी साखर घालावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)