- मेष- आरोग्य सुधारेल. धनलाभ होण्याचा योग असला तरीही आज उत्पनापेक्षा खर्च जास्त असेल. महत्त्वाची कामं उरका.
- वृषभ- नवी नोकरी मिळण्याची संधी आहे. करिअरच्या दृष्टीनं महत्त्वाचं शिक्षण घेण्याचा निर्णय घ्याल. सायंकाळपर्यंत धनलाभ होणार आहे. आज करड्या रंगाचं वस्त्र परिधान करा.
- मिथुन- महत्त्वाची कागदपत्र सांभाळून ठेवा. आई- वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. सायंकाळपर्यंत एखादा प्रवासयोग आहे.
- कर्क- नातेवाईकांशी उगाचा वाद घालू नका. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. एखादा मित्र भेटण्याची शक्यता आहे.
- सिंह- नोकरीच्या ठिकाणी एखादी शुभवार्ता मिळणार आहे. घरातील वातावरण अल्हाददायक असेल.
- कन्या- व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनो अभ्यासावर लक्ष द्या. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
- तुळ- विचार चांगले ठेवा. व्यापारात लाभ होणार आहे. अडचणी दूर होणार आहेत. धनलाभाचा योग आहे पण, चुकीचा मार्ग निवडू नका.
- वृश्चिक- कुटुंबात एखादी आनंदवार्ता कळणार आहे. दुपारच्या वेळी काहीशी धावपळ होईल. कोणत्याही वादात अडकू नका.
- धनू- संतानसुख मिळणार आहे. मोठ्यांचा आदर करा. आज तुम्हाला मिळालेले आशीर्वाद फळणार आहेत.
- मकर- आपल्या माणसांशी असणारे वाद मिटतील. दुरावा कमी होईल, कुटुंबात आनंद नांदेल. गोड पदार्थ दान करा. आज तुमच्या राशीला गुरुचं बळ मिळणार आहे.
- कुंभ- कोणालाही पैसे उधार देऊ नका. व्यावसायिकांना बक्कळ नफा होणार आहे. मसालेदार पदार्थ टाळा.
- मीन- प्रवासयोग आहे. जुने मित्र भेटणार आहेत. एखादी शुभवार्ता कळणार आहे. पिवळ्या रंगाची एखादी वस्तू दान करा.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)