मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आज आपणास अत्यंत शुभ दिनमान आहे. आनंददायी मनात प्रसन्नता राहील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. नोकरीत प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होईल. आपण हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्ती होईल. व्यापारीवर्गाच्या उत्त्पन्नात वाढ होईल. मोठे प्रकल्प मार्गी लागतील. नवीन व्यवसायाची सुरवात करा. चांगल्या कल्पक योजना मांडा. आज यश प्राप्त होईल. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य मिळेल. मनाप्रमाणे घटना घडतील. विद्यार्थीवर्ग संतती करिता हा दिवस सुखप्रद आहे.
आज आपल्या कामकाजामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आपल्या बुदधीच्या जोरावर आलेल्या योजना यशस्वी होतील. व्यापारात काहींना अचानक धनलाभाच्या संधी मालामाल करतील. नोकरीत व्यापारात चांगले काहीतरी करण्याची मानसिकता निर्माण होईल. संततीकडून शुभ संदेश मिळतील. वाचनाची आवड निर्माण होईल दिर्घकालीन सहलीचा आनंद सहकुटुंब लुटाल.अविवाहितांना विवाह योग आहे. शासकीय कामकाजाचे प्रश्न मार्गी लागतील.
आज फायदेशीर बातम्या ऐकायला मिळतील. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील. आपल्या हातून विशेष काम होण्याचे योग आहेत. व्यापारात साथीदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. शारिरिक कामात वाढ करण्यासाठी प्रयत्न करा. काही विशेष कामानिमित्त आपणास लांबच्या प्रवासाचे बेत आखावे लागतील. आर्थिक बाबतीत फायदयाचे दिनमान आहे. व्यापारात गुंतवणुक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल. धनसंचयात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाचा संधी मिळेल.
आज आर्थिक बाबतीत एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. अपेक्षीत लाभ मिळेल. नोकरीत आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळण्याची आज संधी आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. आर्थिक आवक वाढेल. आज आपल्या कामात उत्साह वाटणार आहे. बुद्धीचा वापर करुन पैशाची गुंतवणूक करा. प्रवास सुखकर व हितकारक ठरतील. सामाजिक मान सन्मान मिळेल. मुलाच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळेल. आपलं कर्तुत्व अर्थात स्वतला सिद्ध कराल. व्यापारात नवीन प्रस्ताव येतील.
आज राजकीय सामाजिक कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कामा प्रती सजग रहा. आळस दुर ठेवा. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. परदेश भ्रमणाची शक्यता आहे.
आज आपणास काही बाबतीत मानसिक त्रास सहन करावा लागेल. आज आपणास विशेष सुस्थिती लाभणार नाही. हाती घेतलेल्या कार्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक अशांती असल्याने संकटाचा सामना करावा लागेल. नोकरीत जबाबदारी नुसार कामे करा. कलह वाढविणारे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक पिडादायक दिनमान आहे. व्यवसायिक मंडळीने जपून आर्थिक करावे. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात निष्कारण गुंतला जाल. आर्थिक हानी संभवते.
आज अत्यंत शुभ फळ मिळतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती होईल. नोकरीत कामाप्रती दक्ष रहा. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. विदयार्थ्याच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल.गृहस्थी जीवन जोडीदाराकडून आणि कुटुंबातील वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आपली कामे नियोजनात्मक पद्धतीने सुरुळीत घार पाडाल.
आज आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. रोजगारात प्रगती होईल. जबाबदारी वाढणार आहे. आपले कर्तुत्व सिद्ध कराल. पराक्रम व साहसी वृत्तीत वाढ होईल. व्यापारात नवीन संधी सोडू नका. नोकरीत एका नव्या समुहाशी आपला संबंध जुळण्याचा योग आहे. कुटुंबातील सदस्याकडून उत्तम सहकार्य लाभल्याने स्नेह वाढेल. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे फायदेशीर राहील.
आज आपणास जोरदार शुभफले मिळतील. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. भांवडा कडून मदत मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. लेखक क्षेत्रातील व्यक्तींना शासकीय मानसन्मान मिळेल. आजचा दिवस ठरविल्याप्रमाणे कामे पार पाडण्यात उपयुक्त असा आहे. आर्थिक लाभ होतील. उन्नतीकारक दिवस आहे.
आज आजचा दिवस काहीसा परिक्षा घेणारा आहे. प्रतिकूलता जाणवेल. कामाच्या ठिकाणी ताणतणात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापारात भागीदारा सोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहिल. मोठी आर्थिक मोठी आर्थिक हानी फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा रहिल.छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा.आर्थिक हानीची शक्यता वाटते.
आज कौटुंबिक समस्या दूर होतील. मात्र विलासी भोगी वृत्तीत वाढ होईल. मानसिक अस्थिरतेचा परिमाण रोजगारात जाणवेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कटुता निर्माण होईल असे बोलणे वागणे टाळावे. अंहकारी वृत्तीला आळा घाला. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. व्यापारात आपले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रकरणात गुंतले जाण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील.
आज ताणतणात्मक दिवस राहील. योग्य निर्णय घेता येणार नाहीत. आपण विचारपूर्वकचं निर्णय घ्या. बोलण्यातून गैरसमज वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. स्थानबदलाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळावा. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. मानसिक शारिरिक आरोग्याबाबत अडचणी अदभवू शकतात. पत्नीच्या तब्बेतीची चिंता निर्माण होऊ शकते. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)