Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 12 एप्रिल 2023, या राशीच्या लोकांनी टिकात्मक बोलणे टाळावे

| Updated on: Apr 12, 2023 | 12:05 AM

आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 12 एप्रिल 2023, या राशीच्या लोकांनी टिकात्मक बोलणे टाळावे
आजचे राशी भविष्य
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे भविष्य

मेष

कलाक्षेत्र प्रसाशकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल. आपलं कर्तुत्व अर्थात स्वतःला सिद्ध कराल. अधिकार प्राप्त होतील. प्रेमीयुगुलासाठी उत्तम दिवस आहे. पत्नीकडून सहकार्य कुटुंबातील वरिष्ठ सदस्याकडून प्रशंसा मिळेल. नोकरीत आपल्या कलागुणांना इतराकडून प्रोत्साहन मिळेल. आर्थिक दृष्टीकोनातून परिस्थिती ठिकठाक राहिल. आनंदी दिनमान आहे. काही विशेष नवीन प्रस्ताव येतील. त्यातून आर्थिक लाभ होतील.

वृषभ

काही घटनामुळे आपल्याला आज मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आर्थिक प्रकरणात सावधानी बाळगा. नोकरीत दुसऱ्यांवर रोष करू नका. स्थित्यंतर होण्याची संभावना आहे. व्यवसाय रोजगारात मोठे परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात तसेच पत्नीबरोबर वाद-विवादाचे प्रसंग घडतील. कौटुंबिक सहकार्य कमी लाभेल. व्यावहारिक समस्यांमुळे त्रस्त रहाल. धैर्याने आणि संयमाने काम करा. शक्यतो प्रवास टाळावेत. अपघात भय संभवते. वाहन सावकाश चालवा.

हे सुद्धा वाचा

मिथुन

आज आपण टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यवसायिक विस्ताराच्या दृष्टीने योजना पूर्ण होतील. जनसंपर्क वाढल्याने आपली कामे सुरुळीत पूर्ण होतील. व्यवसायिक स्पर्धेत यशाची संधी आज आहे. दाम्पत्य जीवन सुखी राहील. नोकरीत नवीन योजनेचा प्रारंभ करा. सामाजिक मानसन्मान वाढेल. राजकीय कला क्षेत्रातील व्यकींना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक वाढेल. मानधनात वाढ होईल. मानसन्मान प्राप्त होईल. सामाजिक कार्यात पुरस्कार प्राप्त होईल. खेळाडूंसाठी अनुकूल वातावरण राहिल. दिनमान शुभ आहे.

कर्क

आपण केलेल्या कामाची समाधानकारक पोचपावती मिळेल. कलाकारांना नवीन संधी मिळेल. नोकरीत बदल अथवा मोठ्या पदावर बढ़ती मिळेल. कौटुंबिक सहकार्य लाभेल. धन आणि कर्तुत्वं याचा सुवर्णसंगम साधता येईल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. आनंदी दिनमान राहील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती होईल. मानसन्मान प्राप्त होईल.

सिंह

आपले धैर्य कुंटुंबात व समाजात मानसन्मान मिळवून देणार आहे. छोट्या बाबींकडे लक्ष दया. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून फायदा मिळण्याची शक्यता आहे. भौतिक वादाकडे ओढा राहिल. नोकरीमध्ये अपेक्षेप्रमाणे बढ़ती किंवा बदली होण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक स्थिती चांगली राहिल. आजच्या दिवशी विशेष फायदा होण्याचे योग आहेत. आकस्मिक धनलाभ होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. आंनदायक वातावरण राहिल.

कन्या

बोलण्यातील टीकात्मक वृत्ती टाळा. गैरसमज निर्माण होतील. दिवस धावपळीचा राहील. मानसिक गोंधळ उडालेला असेल. नोकरीत एका योग्य समूहाशी आपला संबंध जुळण्याचा योग आहे. सर्वांच्या बोलण्याला महत्व दया. व्यापारात आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत काहीस असमाधानी राहाल. जोडीदाराच्या संततीच्या आरोग्याची चिंता निर्माणहोईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक वाढेल. व्यसनापासुन दुर रहा. अनैतिक मार्गाचा अवलंब करू नका. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही. याची विशेष काळजी घ्या.

तुला

शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी दिवस फायदेशीर आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्न वाढेल. राजकारणात पदप्राप्ती प्रतिष्ठा वाढेलं. विद्यार्थ्यांच्या विद्याभ्यासातील प्रगती पाहुन मन समाधानी होतील. लाभदायक दिवस असून नोकरी व्यापारात आर्थिकदृष्या रखडलेली कामे आज मार्गी लागतील. प्रवासातुन लाभ होईल. समाधानी दिवस आहे. ग्रहसंकेत उत्तम आहेत. आजच्या शुभ दिवसाचा नक्की फायदा करून घ्या.

वृश्चिक

नविन व्यापार सुरु करण्यासाठी उत्तम दिवस आहे. मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत पद प्रतिष्ठेत वाढ होईल.भावनांवर नियंत्रण ठेवा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. भौतिक सुख समाधनी दिवस आहे. आज विशेष फायदा होण्याचे योग आहेत. कामाचा विस्तार वाढेल. कुंटुबातील ज्येष्ठ आणि संततीच्या आरोग्याकडे लक्ष दया. आरोग्यावर खर्च वाढणार आहे. व्यक्तिगत पातळीवर वातावरण अनुकूल राहणार आहे.

धनु

नोकरीन नवीन योजना फायदेशीर राहतील. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील. काही नवीन भागीदार प्रस्थापित कराल. प्रिय व्यक्तीची भेट होतील. कोर्टकचेरी कायदयाचे वाद असतील तर ते मिटतील. त्यामधून आर्थिक फायदा होईल. अत्यंत लाभदायक दिवस आहे. गृहसौख्य पत्नीसौख्य जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींकडून आणि नातेवाईकांकडून आर्थिक सहकार्य मिळेल. महिलावर्गाचा सन्मान राखा.

मकर

कौटुंबिक पातळीवर संततीविषयी मन चिंताग्रस्त राहील. नोकरीत मनाजोग्या घटना घडणार नाही. विपरित परिणाम दिसतील. व्यवसायात भागीदारासोबत वाद होण्याची शक्यताआहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढेल. मोठी शस्त्रक्रिया अपधात भय संभवते. अनिष्ट दिनमान आहे. वाहन सावकाश चालवा. प्रवास शक्यतो टाळा.

कुंभ

अपूर्ण राहिलेली कामे वेळेत करावी.कामाचा ताणतणाव राहील. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान संभवते.फसवणूकी सारखे प्रकार घडतील. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीन करावे. विचलित व्हाल. मनस्तापासारखा घटना घडली. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असमाधान आणि असंतोष निर्माण होईल. मोठे व्यवहार टाळावेत. प्रकृतीची काळजी घ्या.

मीन

अनेक नवीन संधी नवे मार्ग सापडतील. नोकरदार जोडादाराकडून आपणास सहकार्य लाभेल त्याच्या बढ़ती प्रमोशनचे आज योग आहेत. शासकीय कामकाजास दिवस शुभ आहे. इच्छित कामे मार्गी लागतील.व्यापारात नफ्यात वाढ होईल. नवीन योजनाची सुरुवात कराल. तीर्थयात्रा घडेल. मनइच्छित फलप्राप्ती होईल. दुरवरचे प्रवास लाभदायक होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. आरोग्य स्वास्थ उत्तम राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)