मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजी पणाने वागु नका. नोकरीत बदल नवीन संधी मिळेल. जोडीदारांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरणार आहे. त्याचे सल्ले निर्णायक ठरतील. नोकरीत कनिष्ठ सहकाऱ्यांशी समजुतीचे धोरण स्वीकारावे लागेल. अन्यथा अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संकल्प पूर्ण करण्याकरिता तुमचा भागीदार व वैवाहिक जोडीदार या दोघांची उत्तम साथ मिळणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग आहेत. प्रवासात लाभ होतील. वाईट संगतीपासुन दुर रहा.
पत्नीसोबत मधुर संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या विषयी गैरसमज आणि संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. प्रेमप्रकरणात वादविवादाचे प्रकार घडतील. मित्रमैत्रिणी भागीदारीतील आर्थिक व्यवहार देवाण-घेवाण अडचणीत आणणार आहेत. व्यवसायिकांना कर्ज प्रकरण त्रासदायक ठरण्याची संभावना आहे. नोकरदारांनी वरिष्ठांशी स्नेहपूर्वक वागा.
शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेअर्समधील मोठी गुंतवणूक टाळावी. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. वाहना पासून अपघाताची शक्यता राहिल. आरोग्य ठीक राहणार नाही. घरात कलह होतील. स्थावर इस्टेटीचे व्यवहारात आर्थिक नुकसान संभवते. नोकरीत आपल्या वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता वाटते. मानहानी होण्याची शक्यता आहे. उधळेपणावर आळा घालावा.
माणसं दुरावली जातील असी वर्तणुक टाळावी. नोकरी-व्यापारात आपल्या कार्यक्षेत्रात काही चांगली फळे मिळतील. पण आपण वरिष्ठांशी हितसंबंध जोपसताना सावध असायालाच पाहिजे. सुखात कायम कही ना काही अडथळा येणार आहे. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. पूर्ण सतर्क रहा. फसवणूक आर्थिक हानी संभवते.
आज लक्ष्मीची कृपा होईल. आपल्या कलागुणांना प्रसिद्धी मिळेल. सन्मानाचे सुद्धा योग आहेत. पत्नीचा जोडीदाराचा उत्कर्ष होईल. कौटुंबिक बाबतीत आनंदही उपभोगाल. नव्या संधी प्राप्त होतील. मनाप्रमाणे कामे करता येतील. सामाजीक व्यक्तींना पद मानसन्मान वाढेल. भातृसौख्यच उत्तम लाभेल. भांवडाकडून मोठं सहकार्य मिळणार आहे. मनाजोग्या घटना घडतील. घरात धार्मिक कार्य मंगलकार्य होईल.आनंदाच प्रसन्न वातावरण राहिल. संततीविषयी चिंता मिटेल. शुभप्रद घटना घडतील. कौटुंबिक प्रेम चांगले मिळेल. संततीकडून सुख समाधान लाभेल.
विचाराअंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. या सप्ताहात वारंवार प्रवास करावे लागतील. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळपणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. हानी होऊ शकते.
अनाठायी खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवासाच टाळा.घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे लक्ष केंद्रीत करा. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहिल. आपल्या महत्वकांक्षेवर आवर घाला. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्च वाढेल.
स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. तरुण तरुणीचे विवाहाचे योग आहेत. विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली सुधारणा होईल.
धार्मिक अध्यात्मिक सोख्य लाभेल. सत्पुरुषांच्या सेवेतून सन्मार्गाने उत्तम धन मिळेल. सार्वजनिक कामात भाग घ्याल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील.मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातुन धनप्राप्ती होईल. स्पर्धापरिक्षेत यश लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. नोकरीत बदलीचे योग आहेत.
राजकीय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. वाहन-घर खरेदीसाठी शुभ योग आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील.
कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य लागेल. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाला उत्तम दाद मिळेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ लाभेल. सोबतच आपण केलेल्या कामाचे कौतूक होऊन मानसन्मान देखील लाभणार आहे. वाहन सौख्य मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. व्यापारात व्यवसियाकांनी केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल.
आपल्या कार्यक्षेत्रात परिस्थिती संयम ठेवून हाताळा. अन्यथा प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. नोकरीत स्थान बदल घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गास प्रतिकुल काळ असणार आहे. गुप्तशत्रु विरोधकांचा त्रास जाणवेल. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास अस्वस्थता जोडीदाराशी वादविवाद असे प्रसंग घडतील. शक्यतो वादविवाद टाळा. प्रवासात काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)