मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील.भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार-व्यवसायात तेजी राहिल. एकत्रित सहलीचे नियोजन कराल. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल.आर्थिक लाभ होतील.
अनावश्यक राग करू नका. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. यात्रा सुखात होण्याचे योग आहे. व्यापारात फायद्याच्या नवीन संधी मिळतील. भागीदाराकडू सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींकडून कामाबद्दल सहकार्य मिळेल. कौटुंबिक सौख्य चांगले राहिल. संततीची प्रगती पाहून मन समाधानी होईल. आकस्मित धनप्राप्ती व प्रवासातून लाभ घडतील. कटुता निर्माण होईल असे बोलणे मात्र टाळावे. नवीन घर वाहन सुख मिळेल.
घाईत निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे कण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. खर्चामध्ये वाढ होईल. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. वाहन सावकाश सांभाळून चालवा. अपघात भय संभवते.
मित्र आणि शुभचिंतक याच्या माध्यमातून आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. नोकरीत प्रगती होण्याचे संकेत मिळतील. मोठ्या तसेच प्रतिष्ठित लोकांशी संबंध वाढतील. कुटुंबातील सदस्याची प्रगती होईल. विचारपूर्वक कामे केली तर आजचा दिवस चांगला जाईल. आपल्या कामाची स्तुती होईल. मानसन्मान वाढीस लागेल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.
रोजगारात बदल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नीच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या. मुलाची चिंता सतावेल. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढणार आहे. शारिरिक व्याधी उद्भवतील. शक्यतो प्रवास टाळा. वाहनापासून इजा संभवते. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. व्यसनापासून दूर राहा. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक वादविवाद टाळावेत.
समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. उद्योग व्यापार तेजील राहील. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. भाऊबहिणीसी सलोख्याचे संबंध राहतील. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील. प्रयत्न केल्यास थकित रक्कम प्राप्त होईल.
नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. निंदानालस्ती टाळा. संयमी भुमिकेतून वाटचाल करावी.
नोकरीत जबाबदारीच्या कामात सावधानतेने पाऊल उचला. जास्त उत्साह दाखविल्यामुळे जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल.दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील.भांवडाकडून सहकार्य लाभणार आहे. एकंदरीत सामान्य कामासाठी दिवस चांगला राहणार आहे. वाईट सवयी पासून दूर राहा.
नोकरीत स्वतःचा निर्णयावर ठाम राहिल्याने आपल्याला प्रतिकूल परिणाम दिसून येतील. आपले प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील. सन्मान व किर्ती डागळण्याची शक्यता आहे. खर्च विचारपूर्वक करावा. सरकारी कामे रखडतील. व्यापारात आर्थिक हानी घडण्याची शक्यता आहे. मनस्ताप हानी होण्याची शक्यता चालूनही आहे. मुलांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल.
घरामध्ये लक्ष दिले असता घरातील समस्या सहजा सहजी दूर होतील. व्यापार रोजगारात लग्न स्थानातील भ्रमणामुळे अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. कुंटुंबातील समस्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर नियोजन सोडविण्याचा प्रयत्न करा.व्यापारिक वाद संपुष्टात येतील. सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. मौजमजा करण्याकडे कल राहील. वाद विवाद टाळावेत. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. परदेश भ्रमण घडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आज व्यापारात नोकरीत राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विवेकबुद्धीने काम करा. अन्यथा हानी संभवते. घरात एखादयाशी मतभेद निर्माण होतील. शुभकार्य,धार्मिक कार्यात पैसे खर्च होतील. व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळयाची शक्यता आहे. सामाजिक किंवा साहित्यिक समारंभात भाग घ्याल. भांडण आणी वाढविवाद टाळावेत. कुटुंबातील सदस्याच्या सहकार्याने कामात यश संपादन कराल. पत्नीसोबत वाद घालू नका. पत्नीच्या सहकार्याने काही योजनावर कार्य सुरु कराल. आर्थिक परिस्थितीत प्रयत्नाने सुधारणा होऊ शकते.
अनुकुल स्थिती राहणार आहे. नोकरीत वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. विचाराअंतीच निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. ज्यांच्या भविष्यात फायदा होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिनमान आहे. संततीकडून समाधान लाभेल. परदेशगमनाची शक्यता आहे. लाभदायक दिवस असून प्रवासातून लाभ होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)