मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
भावंडांशी संबंध दुरावणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडतील. काही बाबतीत मानसिक ताणतणाव निर्माण होतील. व्यापारात महत्वाचे निर्णय शक्यतो आज टाळावेत. नातेवाईकांशी असलेल्या संबंधात मर्यादा राखा. मानसिक ताणतणावामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात विवाद टाळावेत. शक्यतो दूरवरचे प्रवास नुकसानकारक ठरणार आहेत.
बौद्धिक क्षेत्रात आपली प्रतिष्ठा उंचावेल. नोकरी रोजगारात आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगले वातावरण राहिल. आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाचं लेखन होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल.व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागतील. विवाह इच्छूकांचे विवाह जुळून येतील. संततीकडून शुभवार्ता समजतील. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल.
आज कायद्याच्या नियमाच्या विरुद्ध काम केल्यास शिक्षा होण्याची शक्यता राहिल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक कारवाया करयाची संधी दवडणार नाहीत. व्यापारात उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. अशुभ स्थानातून भ्रमण होत असल्याने देवी पाठबळ लाभणार नाही. वास्तुविषयी प्रश्न, कामे रेंगाळतील. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. बोलताना शब्द तोलुन-मापून वापरावेत अन्यथा समोरचा व्यक्ती दुखावला जाण्याची शक्यता आहे. व्यापारात नुकसान संभवते. प्रकृती आस्थिर राहणार आहे.आरोग्याची काळजी घ्या.
नवीन उपक्रम हाती घ्याल. मोठ्या व्यक्तींचा सहवास लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य आपल्या हातून होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा होईल. परंतु अप्रतिष्ठा होण्याचे योग आहेत. काहीना प्रमोशन मिळण्याची किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात वृद्धि काळजी होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही या विषयी घ्यावी. नवीन ओळखीतून फायदा होईल. आकस्मिक धनलाभ होईल.
जुन्या प्रॉपर्टीचे प्रश्न आचानक निर्माण होतील. दिनमान समिश्र फलदायी ठरणारआहे. नोकरीतील वातावरण गैरसमजाचे राहिल. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. वरिष्ठांकडून कामाची अपेक्षा वाढणार आहे. व्यापारात फसगत होण्याची शक्यता आहे. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही. याकडे लक्ष द्यावे. अपेक्षित कामे रखडण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवाया वाढतील. त्यामुळे ताणतणाव वाढण्याचे योग आहेत. शत्रुपक्ष वरचढ होण्याची शक्यता आहे.
नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल.मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल.अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. भाषाभ्यास, ग्रंथलिखाणास उत्तम दिवस आहे. विद्यार्थी विद्याभ्यासात प्रगती करतील. संशोधनपर केलेल्या कामास मानसन्मान पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
आर्थिक उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहील. दुसऱ्याला जामीन राहू नका अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. चाण्यक्यनीतीचा वापर करून काही बाबतीत यश संपादन करू शकाल. व्यापार रोजगारात आर्थिक उन्नती होईल पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. आपल्या मनातील आवडी निवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. नोकरीत बढतीची शक्यता राहील. राजकिय सामाजिक आपली प्रतिष्ठा ढासळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यावर खर्च होण्याची शक्यता आहे.
नोकरीत सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. मोठ्या व मान्यवर व्यक्तींच्या गोठाभेटी होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नवीन जागा घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत प्रशंसा केली जाईल. प्रलोभनाला मात्र बळी पडू नका. व्यापारात नवीन योजना आखाल. नवीन उपक्रम सुरू कराल. आत्मविश्वास व मनोबल उंचावलेले राहील. संतती सौख्य उत्तम राहील. शेअर्स मधील दीर्घकालीन गुंतवणुक फायदेशीर ठरेल.घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. कर्जाची मागणी मंजूर होईल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
काहीसा अडचणीत आणणारा त्रासदायक दिवस ठरेल. पती पत्नीमध्ये बेबनाव गैरसमज होणार नाही याविषयी काळजी घेणे योग्य ठरेल. नोकरीत खूप मेहनत घ्यावी लागेल. आपल्याविरुद्ध मात्र गैरसमज किंवा निंदानालस्ती होण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील. हातून वाईट अनैतिक कृत्य होण्याची संभावना आहे. जमीन जुमल्याच्या व्यवहारात नुकसान होईल. आर्थिक प्रकरणे काळजी पूर्वक हाताळा.
नोकरीत प्रमोशन व वेतनवाढ होण्याची शक्यता आहे.आकस्मिक लाभ होतील. विरोधकावर मात करू शकाल. आपले वर्चस्व सिद्ध कराल. व्यापारात विरोधक आक्रमक होतील.त्याचा बीमोड करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य मिळेल.स्विकारलेली कामे यशस्वी होतील.मनाजोग्या घटना घडतील. आर्थिक आवक वाढेल. दूरवरचे प्रवास शक्यतो टाळावेत. वाहन सावकाश चालवा. नव्या योजनाना आज चांगला प्रतिसाद मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहिल.
रोजगारात स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या. बढतीची शक्यता आहे. नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. संकुचित मनोवृति टाळाजी राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती मिळेल. आपली प्रतिष्ठा वाढीस लागेल. कामात यश आल्याने आपले मनोधर्य उंचावेल. दुर्व्यसनांपासून सावध राहा. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. शासकीय कामकाजास शुभ दिनमान आहे. अधात्मशास्त्राकडे कल राहिल. वैवाहिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पत्नी जोडिदारासोबत सुसंवाद ठेवण्याचा प्रयत्न करा.
नोकरीत अनुकुल योग आहे. देवधर्म व धार्मिक स्थळांना भेट दयाल. नोकरीनिमित्त दुरवरचे प्रवास घडतील. प्रवासातुन लाभ होईल.अध्यात्म क्षेत्रात रममाण होण्याची शक्यता आहे. भाग्योदय होण्याचा योग असून मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. आपले डावपेच यशस्वी होतील.सत्संग घडेल.विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. व्यापारात योजना सफल होतील. ईश्वराची आराधना याकडे कल राहील. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. व्यापार उद्योगात वाढ होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)