Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 9 मे 2023, या राशी लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेत लाभ होईल
मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
1 / 12
मेषः शासकीय सेवेत नियमबाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भवतील. कुटुंबापासून विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल. दुसऱ्यावर अति विश्वास ठेवू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्या. आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींना साधनेसाठी अनुकुल दिवस आहे.
2 / 12
3 / 12
मिथुन: वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. यश व फायदा मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. जुन्या परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत कला गुणासाठी चांगले वातावरण राहील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. संतसाहित्य स्वरुपाचे लेखन होईल. संततीची काळजी घ्या. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका.
4 / 12
कर्क: कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. प्रगतिकारक दिवस आहे. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. काहींना प्रमोशन व वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे.
5 / 12
सिंह: नोकरी व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य कार्य घडेल. एखादी महत्वाची पण विलंबाने झालेली कृती फायद्याची जाणवेल.
6 / 12
कन्या: आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका.कामचुकारपणा करू नका. मागील स्मृती उजाळल्याने दुखः होईल. शक्यतो प्रवास टाळा. दुघर्टना घडण्याची शक्यता आहे.
7 / 12
तुळ: व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. दुसर्याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे. एखाद्या विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. विरोधक आक्रमक होतील त्यांचा वेळीच बिमोड कराल तर यशस्वी व्हाल. पत्नीकडून सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प कामे पुर्णात्वास जातील. आरोग्य उत्तम राहील.
8 / 12
वृश्चिक: रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध रहा. व्यसनी मित्रांपासून दूर राहा. आपल्या विरोधात काहुर उठेल.मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. घरातील वातावरण बिघणार नाही, याकडे लक्ष द्यावे. सावधानीपूर्वक वाटचाल करावी.
9 / 12
धनु: अनावश्यक चिंतेपासून दूर राहा. देणे-घेणे सावधानता बाळगा. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. व्यापार-व्यवसायात दिवस फायदेशीर राहील. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. व्यापारात नवीन योजना आखाल त्या फायदेशीर ठरतील. घरगुती वातावरण चांगले राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. कौटुंबिक जीवन सुखी राहील.
10 / 12
मकर: आपल्या हातून विशेष काम होण्याचे योग आहेत. व्यापारात साथीदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. शारिरिक कामात वाढ करण्यासाठी प्रयत्न करा. काही विशेष कामानिमित्त आपणास लांबच्या प्रवासाचे बेत आखावे लागतील. आर्थिक बाबतीत फायद्याचे दिनमान आहे. व्यापारात गुंतवणुक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल. धनसंचयात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाचा संधी मिळेल. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील.
11 / 12
कुंभ: व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखकवर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मानसन्मान मिळेल. कर्तुत्व सिद्ध करू शकाल. हातून विधायक कार्य घडेल. अतिरिक्त कामानुन उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाईगडबड करू नका.
12 / 12
मीन: नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. जोशपूर्वक कामात रस घ्याल. विद्वान लोक भेटतील. कौटुंबिक समाधानन लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील.