मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
बोलताना आपला मुद्दा स्पष्ट मांडा. रचनात्मक कार्याची चुणूक दाखवा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. प्रेम सौख्यात वाढ होईल. घरगुती वातावरण आनंदी असेल. जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये. नवीन गोष्टी आमलात आणाव्यात.
आपले मानसिक आरोग्य बिघडवू नका. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. स्थावर मालमत्तेतून लाभ संभवतो. दिवस आपल्या आवडी प्रमाणे घालवा. आपला संयम कमी येईल. अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.
खेळ व कला यांमध्ये वर्चस्व राहील. अनपेक्षित खर्च सामोरी येतील. मानसिक सौख्याला प्राधान्य द्या. व्यापारी वर्गाने भागीदारीकडे अधिक लक्ष द्यावे. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. धैर्याने परिस्थिती हाताळावी.
आपले हितचिंतक पारखून घ्या. डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका. प्रलंबित येणी वसूल होऊ शकतील. काही परिवर्तन सकारात्मक ठरतील. घरात टापटीप ठेवाल. मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल.
आपली स्वप्ने सत्यात उतरतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. त्या प्रमाणे केलेली कृती समाधान देईल. कामे मनाजोगी पार पडतील. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वडीलधार्या मंडळींची काळजी घ्यावी. दिनक्रम व्यस्त राहील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका.
घरामध्ये शांतता नांदेल. दिवस आनंदात जाईल. अधिक ऊर्जा व उत्साहाने कामे कराल. कामातील बदल आनंद देईल. मन प्रसन्न राहील. घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तू खरेदी कराल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.
आपल्या स्वत:साठी काही खर्च कराल. हितशत्रू कडे दुर्लक्ष करू नका. मानसिक आरोग्य जपावे. खर्चाचा ताळमेळ साधावा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. सर्वत्र आनंद शोधाल. अचानक खर्च उद्भवू शकतात.
आपल्याच मतावर अडून राहाल. चारचौघांत कौतुक होईल. आवडत्या व्यक्तीची साथ मिळेल. तुमचा रूबाब वाढेल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल. अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अधिकारात वृद्धी होईल.
आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या. मोहाला बळी पडू नका. कामातून आनंद शोधाल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संभवतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर मांडाल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील.
जिद्द व चिकाटी सोडू नका. जुगारात धनलाभ संभवतो. विवाहाचे प्रस्ताव पुढे येतील. व्यापारातील नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल. नोकरीमध्ये कामाकडेच पूर्ण लक्ष द्या. आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
खरेदीचे निर्णय लांबणीवर टाकाल. व्यवहारात गल्लत करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. घरातील वातावरण सकारात्मक असेल. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च कराल. कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल. व्यवसाईकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा.
प्रलंबित येणी मिळतील. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कामानिमित्त प्रवास घडेल. व्यापारात नवीन धोरण ठरवाल. ध्येयाचा पाठलाग करा. नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. पदोन्नतीचे योग संभवतात. घरात अतिथी जमतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)