मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आवडी-निवडीसाठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केंद्रित करावे.
मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आपले मानसिक आरोग्य जपावे. अतिविचार करू नये. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.
जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील.
उगाच कोणाच्या भरवश्यावर राहू नका. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्यांची मदत मिळेल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल. आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका. आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील. मन प्रसन्न राहील.
काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कामाची धांदल उडू शकते. जुने आजार दुर्लक्षित करू नका. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. दिवसभर आत्ममग्न राहाल. टीकेकडे फार लक्ष देऊ नये. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत.
अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या. संमिश्र घटना घडू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरणात रमाल. आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.
क्रोधवृत्तीला आवर घालावी. अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. अति विचार करू नका. घरात सामंजस्याने वागावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. डोकेदुखीचा त्रास संभवतो. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.
अहंकाराला खतपाणी घालू नका. बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. मदतीला मागे हटु नका. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या.
कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ कमवाल. वडीलांचे सहकार्य मिळेल. आहाराचे पथ्य न चुकता पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.
पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. काही गोष्टीत समाधान मानावे लागेल.
काहीशी मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका. घरगुती वातावरण हसते-खेळते राहील. जोडीदाराची चंगाली साथ मिळेल. भागीदारीत फार विसंबून राहू नका. काही गोष्टींचे चिंतन करावे. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. जुगारातून लाभ संभवतो.
जुगारातून लाभ संभवतो. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. दिवस खेळीमेळीत जाईल. अतिघाई करू नये. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका. घरातील वातावरण खेळकर राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)