मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा एक ठिकाणी स्वस्थ न बसणारा ग्रह आहे. दर सव्वा दोन दिवसांनी राशीबदल करत असतो. इतकंच काय तर त्याच्या कलाही बदलत असतात. त्यामुळे त्याचा प्रभाव मानवी जीवनावर होतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं. 9 जानेवारीला होणाऱ्या चंद्राच्या गोचरामुळे बरीच उलथापालथ होणार आहे. कारण चंद्र या दिवशी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे त्रिग्रही योग जुळून येणार आहे. कारण मंगळ आणि सूर्य याच राशीत ठाण मांडून आहेत. तर चंद्राच्या आगमनाने काही शुभ अशुभ योग तयार होणार आहे. मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे लक्ष्मी योग तयार होईल. 11 जानेवारीपर्यं लक्ष्मी योगाची फळं जातकांना मिळतील. तसेच मंगळ आणि सूर्याची युतीमुळे आदित्य मंगळ योग सुरु आहे. त्यामुळे जातकांना सकारात्मक अनुभूती होईल. पण असं असलं तरी सूर्य आणि चंद्राचं एकमेकांशी तितकं चांगलं नातं नाही. त्यामुळे त्याचा थोड्याफार अंशी नकारात्मक परिणा होईल.
वृश्चिक- चंद्राच्या गोचरासोबत या राशीच्या जातकांना चांगली फळं मिळतील. अचानक काही अडचणी चुटकीसरशी सुटतान दिसतील. कारण त्रिग्रही योग या राशीच्या द्वितीय स्थानात होत आहे. त्यामुळे आर्थिक कोंडी बऱ्यापैकी सुटताना दिसेल. लक्ष्मी योगाचा फायदा होईल. पैशांचे नवे स्त्रोत तयार होतील. तर अडकलेले पैसे मिळतील, असं ग्रहमान आहे. लॉटरी आणि शेअर बाजारातून लाभ होईल अशी शक्यता आहे.
कुंभ- या राशीच्या एकादश स्थानात त्रिग्रही योग जुळून येत आहे. हे स्थान उत्पन्न आणि लाभाचं स्थान आहे.व्यवसायातून चांगलं उत्पन्न हाती पडेल. काही करार या कालावधीत निश्चित होऊ शकतात. मोठी डील झाल्याने आर्थिक कोंडी फुटताना दिसेल. तसेच गेल्या काही दिवसांपासून असलेली अडचणीही दूर होईल. लाभ स्थान असल्याने अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
मीन – या राशीच्या दशम स्थानात त्रिग्रही योग तयार होत आहे. तर प्रथम स्थानात राहु विराजमान आहे. राहुचा प्रभाव असला तरी त्रिग्रही योगाचा फायदा होईल. नोकरी शोधणाऱ्या जातकांना काही ऑफर मिळू शकतात. तसेच मोठ्या पगाराची नोकरी पायघड्या घालून समोर येऊ शकते. करिअरमध्ये बदल करायचा असल्यास ही वेळ उत्तम आहे. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)