Door Vastu Tips : मुख्य दरवाज्यात असा तयार होतो वास्तुदोष, या उपायांनी कराल दूर
मुंबई : ज्योतिषशास्त्राप्रमाणे वास्तुशास्त्राला महत्त्व देण्यात आलं आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक वस्तू वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. असंच घराच्या मुख्य दरवाज्याबाबत सांगण्यात आलं आहे. मुख्य दरवाज्यावर शुभ चिन्हांमुळे सकारात्मक उर्जा राहते. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य कायम वास करते. पण असं असूनही आर्थिक आणि इतर संकटांचा सामना करावा लागतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्याबाबत काही वास्तु नियम सांगण्यात आले आहेत. याकडे कानाडोळा केल्यास वास्तुदोष निर्माण होतो. चला जाणून घेऊयात वास्तुदोष दूर करण्याचे उपाय
मुख्य दरवाजा आणि वास्तुदोष दूर करण्याचे उपाय
- वास्तुनुसार घरचा मुख्य दरवाजा कधीही तुटलेला नसावा. कधीही मुख्य दरवाज्यात घाण किंवा जळमटं नसावीत. असं असल्यास मुख्य दरवाज्यात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे असं असेल तर लवकरात लवकर दूर करा.
- वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाबाहेर चप्पल, बुटं ठेवणं अशुभ मानलं जातं. यामुळे वास्तुदोष आणखी वाढत जातो. तसेच घरात नकारात्मक उर्जेचा वास होतो.
- वास्तुशास्त्रानुसार घर किंवा फ्लॅटमध्ये कधीही तीन दरवाजे एका सरळ रेषेत नसावेत. वास्तूमध्ये हा एक मोठा दोष मानला जातो. यामुळे आर्थिक समस्या आणि मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात. जर दरवाजे काढणे अवघड असेल तर मधल्या दरवाजावर जाड पडदा किंवा मध्ये मोठा बोर्ड पेंटिंग लावावा.
- वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजासमोर काही वस्तू ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. मुख्य दरवाजासमोर मोठे झाड, काटेरी झुडपं, खड्डा, विहीर, मंदिर, खांब, भट्टी इत्यादी असल्यास वास्तु दोष निर्माण होतो. आयुष्यात सर्व प्रकारच्या समस्या येतात. असा वास्तुदोष लवकरात लवकर दूर करावा.
- वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा चुकीच्या दिशेला असण्यानेही मोठे दोष निर्माण होतात. वास्तूनुसार, व्यक्तीने दक्षिण, नैऋत्य, उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व दरवाजे असलेले घर किंवा फ्लॅट खरेदी करणे टाळावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)