Vastu Shastra : एकही रूपया खर्च न करता दूर करा वास्तूदोष, हे सोपे उपाय करा

| Updated on: Dec 21, 2023 | 2:06 PM

घरात वास्तूदोष असल्यास नकारात्मक उर्जा निर्माण होते. वास्तूदोष दूर करण्यासाठी पैसे खर्च करावा लागते असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, एकही रूपया वेगळा खर्च न करता तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतूनच वास्तूदोष दूर करू शकता.

Vastu Shastra : एकही रूपया खर्च न करता दूर करा वास्तूदोष, हे सोपे उपाय करा
वास्तूशास्त्र
Follow us on

मुंबई : तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू लागला की कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे आणि वादावादी सुरू होतात. यासोबतच कुटुंबाच्या प्रगतीत किंवा शुभ कार्यातही अडथळे निर्माण होतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला वास्तुचे असे काही उपाय (Vastu Tips Marathi) सांगणार आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही घरातील नकारात्मकतेपासून सहज सुटका मिळवू शकता. हे असे वास्तु उपाय आहेत ज्यात तुम्हाला पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तु उपाय जाणून घेऊया.

खराब वस्तू घराबाहेर काढा

जर तुम्हाला घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकायची असेल तर घर नेहमी स्वच्छ ठेवा. यासह खराब झालेल्या किंवा निरुपयोगी वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक वस्तू, थांबलेले घड्याळ इत्यादी घराबाहेर काढा. अशा गोष्टी घरात नकारात्मकता वाढवण्याचे काम करतात.

तुपाचा दिवा लावा

जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा स्थिरावली असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घराच्या मंदिरात गाईच्या तुपाचा दिवा लावा. यासोबतच तुळशीला तुपाचा दिवा लावावा. संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावल्याने धनाची देवी लक्ष्मीचे आगमन होते.

हे सुद्धा वाचा

मीठाने घर पुसा

जर तुमच्या घरात नेहमी नकारात्मक उर्जा प्रवाहित राहात असेल तर पाण्यात मीठ मिसळा आणि दररोज घर पुसा. शक्यतो यासाठी खडे मीठ वापरा. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यासोबतच घरात नारळपाणी शिंपडल्यास सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

मुख्य प्रवेशद्वारावर हे उपाय करा

जर तुम्हाला घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर आंब्याच्या पानांची तोरण बनवून मुख्य दारावर बांधा. पण लक्षात ठेवा की आंब्याची पाने हिरवी असावीत. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वास करते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)