Vastu Shastra: या उपायांनी होईल लक्ष्मी माता प्रसन्न, घरात नांदेल सुख शांती

| Updated on: Aug 12, 2022 | 6:56 PM

वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) घरामध्ये सर्व काही योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी असल्यास, घरात लक्ष्मीचे  (Lakshmi) आगमन निश्चित आहे. दुसरीकडे घरातील वास्तूमध्ये दोष असल्यास घरात येणारा पैसा थांबू शकतो.

Vastu Shastra: या उपायांनी होईल लक्ष्मी माता प्रसन्न, घरात नांदेल सुख शांती
Follow us on

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. ऊर्जेशी संबंधित असलेल्या या शास्त्राचे अनेक सकारात्मक परिणाम आहेत.  वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) घरामध्ये सर्व काही योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी असल्यास, घरात लक्ष्मीचे  (Lakshmi) आगमन निश्चित आहे. दुसरीकडे घरातील वास्तूमध्ये दोष असल्यास घरात येणारा पैसा थांबू शकतो. यासोबतच घरातील आर्थिक प्रगतीमध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होऊ लागतात. आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्राच्या अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे घरात धनाचे आगमन टिकून राहते. यासोबतच ते घरात आनंदही आणतील. चला जाणून घेऊया वास्तूच्या काही खास उपायांबद्दल.

 

वास्तूशास्त्राच्या या नियमांनी लक्ष्मी होईल प्रसन्न

  1. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पूजा मंदिर नेहमी पूर्व दिशेला ठेवावे. हे शक्य नसेल तर पूर्व-उत्तर कोनात ठेवणे योग्य मानले जाते. याशिवाय पूजनगृह किंवा पूजा मंदिरात अगरबत्ती आणि पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी आग्नेय दिशेचा वापर करणे चांगले.
  2. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये 7 घोड्यांचे चित्र असणे शुभ असते. असे मानले जाते की, यामुळे घरात सकारात्मक उर्जा राहते. यासोबतच घरात लक्ष्मीचे आगमन होते. वास्तूनुसार 7 घोडे असलेल्या रथाचे चित्र नेहमी पूर्व दिशेला ठेवावे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. वास्तूनुसार घरामध्ये शेंदूर असलेल्या गणेशाचे चित्र देखील शुभ असते. घराच्या मंदिरात ईशान्य दिशेला सिंदूरी गणेशाचे चित्र किंवा मूर्ती लावल्याने त्याचे आशीर्वाद कायम मिळतात, असे मानले जाते.
  5. वास्तू तज्ज्ञांच्या मते घराच्या ड्रॉईंग रूममध्ये पक्ष्यांचे चित्र लावणे शुभ असते. दिवाणखान्यात उडणाऱ्या पक्ष्यांचे चित्र लावणे फायदेशीर असते, असे म्हणतात.
  6. वास्तूनुसार घरामध्ये तुळशीचे रोप लावणे शुभ असते, परंतु जर ते योग्य दिशेने लावले नाही तर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. घरात एका तुळशीच्या रोपासह अनेक झाडे लावता येतात. घराच्या उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला म्हणजेच तुळशीची पाच रोपे लावल्यास लाभ होऊ शकतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)