Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार घरात लावा या पक्ष्यांचे फोटो, मिळेल भाग्याची साथ

| Updated on: Oct 04, 2023 | 7:24 PM

तथापि, जेव्हा आपण घरामध्ये पक्ष्यांचे फोटो लावतो तेव्हा आपण कोणत्या प्रकारच्या पक्ष्यांचे फोटो लावत आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. घरामध्ये जंगली पक्ष्यांची चित्रे लावू नयेत, जसे की गिधाड, घुबड, कावळे, वटवाघुळ इत्यादींचे फोटो घरात लावू नयेत.

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार घरात लावा या पक्ष्यांचे फोटो, मिळेल भाग्याची साथ
चिमणी
Image Credit source: Social
Follow us on

मुंबई : आपल्या जीवनात पक्ष्यांना विशेष महत्त्व आहे. ते निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यांचे सौंदर्य निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव करून देते. अनेक जण घराच्या सजावटीसाठीसुद्धा पक्ष्यांच्या चित्रांना महत्त्व देते. पक्ष्यांची चित्रे घरात एक नैसर्गिक भावना आणतात. वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) ही चित्रे घराला सुंदर तर बनवतातच, शिवाय घरात सकारात्मक ऊर्जाही वाढवतात. जर तुम्हाला भाग्याची साथ मिळत नसेल तर घरात पक्ष्यांचे फोटो लावल्याने लाभ होऊ शकतो.

कोणत्या पक्ष्याचा फोटो कुठे लावावा?

चिमणी : चिमणी हे जीवनातील साधेपणा आणि आनंदाचे प्रतीक आहे. चिमण्यांचा फोटो पूर्व दिशेला लावल्याने घरात सकारात्मकता येते.

मोर : उत्तर आणि दक्षिण दिशेला मोराचे फोटो लावल्याने घरात प्रफुल्लीत वातावरण निर्माण होते. मोर हे प्रेम, सौंदर्य आणि विशिष्टतेचे प्रतीक मानले जाते.

हे सुद्धा वाचा

नीलकंठ : नीलकंठ पक्ष्याचे चित्र घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती आणते. ईशान्य दिशा ही फोटो लावण्यासाठी सर्वात योग्य दिशा आहे.

पोपट : उत्तर-पश्चिम दिशेला पोपटाचे चित्र लावल्याने घरात समृद्धी आणि संवाद कौशल्य वाढते.

कबुतर : कबुतराचे फोटो घरात शांती आणि प्रेमाचा संदेश देते. त्याची स्थापना पश्चिम दिशेला करावी. पांढरे कबूतर, ज्यांना प्रेम पक्षी म्हणून पाहिले जाते, विशेषत: घरात सकारात्मकता आणि प्रेम आणतात.

या पक्ष्यांचे फोटो घरात लावू नये

जंगली पक्षी : तथापि, जेव्हा आपण घरामध्ये पक्ष्यांचे फोटो लावतो तेव्हा आपण कोणत्या प्रकारच्या पक्ष्यांचे फोटो लावत आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. घरामध्ये जंगली पक्ष्यांची चित्रे लावू नयेत, जसे की गिधाड, घुबड, कावळे, वटवाघुळ इत्यादींचे फोटो घरात लावू नयेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)