Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार जेवण करतांना या चुका टाळा, माता लक्ष्मी होते नाराज

| Updated on: Jul 08, 2023 | 8:31 PM

माणूस अन्नासाठी रात्रंदिवस काम करतो. अन्नाला सगळ्याच धर्मात सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. अन्नाशी संबंधीत अनेक नियम शास्त्रात सांगितले आहे.

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार जेवण करतांना या चुका टाळा, माता लक्ष्मी होते नाराज
वास्तूशास्त्र
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : वास्तुशास्त्रामध्ये (Vastu Tips) प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही नियम बनवलेले आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तूशास्त्रात जेवण्याच्या पद्धती आणि काही नियम देखील सांगितले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास आरोग्य बिघडू शकते. यामुळे देवी लक्ष्मी देखील कोपते आणि व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जाणून घ्या अन्नाशी संबंधित वास्तूचे हे नियम.

जेवणाशी संबंधित या चुका टाळा

 

हे सुद्धा वाचा
  • जेवताना दिशेची काळजी घेतली पाहिजे. वास्तु नियमानुसार दक्षिण दिशेला तोंड करून अन्न कधीही जेवू नये. ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेला तोंड करून जेवल्याने आयुर्मान कमी होते. दुसरीकडे, पश्चिम दिशेला तोंड करून जेवल्याने तुमचे आरोग्य बिघडते.
  • नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवावे. या दोन्ही दिशांना देव दिशा मानले जाते. या दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि आरोग्यही चांगले राहते.
  • बूट घालून किंवा डोके झाकून कधीही जेवू नका. हा अन्नाचा अपमान मानला जातो. पलंगावर बसून कधीही जेवू नये. त्यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात आणि व्यक्तीवर कर्ज वाढते.
  • अंघोळ केल्याशिवाय कधीही जेवू नये. आंघोळ केल्यावर नेहमी स्वच्छ कपडे घालूनच जेवावे. यामुळे लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी या दोघीही प्रसन्न राहतात, असे मानले जाते.
  •  कधीही तुटलेल्या भांड्यात किंवा हातात ताट धरून जेवू नये. वास्तूनुसार जेवण्याची उत्तम जागा म्हणजे स्वयंपाकघर किंवा त्याच्या आजूबाजूची जागा. नैसर्गिक प्रकाश आणि शुद्ध हवा सतत येत राहते अशा ठिकाणी जेवावे.
  • नेहमी शांत आणि आनंददायी वातावरणात जेवले पाहिजे. जितकी भूक आहे तितकेच अन्न ताटात घ्यावे. उष्टे अन्न टाकल्याने अन्नाचा अपमान होतो. त्यामुळे घरात पैसा आणि अन्नधान्याची चणचण भासते.
  • वास्तुशास्त्रात अन्नग्रहण करण्याची शुभ वेळ म्हणजे सकाळी सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी. यावेळी जेवल्याने सहज पचते आणि आरोग्य चांगले राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)