अंथरूणावर का जेवू नये?
Image Credit source: Social Media
मुंबई : वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीसाठी काही खास नियम बनवले आहेत. बऱ्याचदा नकळत आपण अशा अनेक गोष्टी करतो ज्यामुळे वास्तुदोष होतो. त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो. या वास्तू दोषांमुळे कुटुंबातील सदस्यांची आर्थिक समृद्धी, यश आणि प्रगती थांबते. वास्तूशास्त्रामध्ये (Vastushastra) सकाळी उठण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करण्यास मनाई आहे. तुम्हीही हे करत असाल तर लगेच सावध व्हा. बिछान्यावर बसून जेवण्याचे (Eating on Bed) काय तोटे आहेत ते जाणून घेऊया.
अंथरूणावर बसून का जेवू नये?
- अनेकांना अंथरुणावर बसून अन्न खाण्याची सवय असते. हे लोक आपल्या बेडरुममध्ये बेडवर बसून जेवतात. वास्तूनुसार, अंथरुणावर बसून जेवल्याने आरोग्याला हानी तर होतेच पण आर्थिक संकटही येते. वास्तुशास्त्रानुसार, अंथरुणावर बसून जेवल्याने लक्ष्मी क्रोधित होते आणि ती त्या घरात कधीच टिकत नाही.
- ज्या घरात लोक अंथरुणावर बसून जेवतात, त्या घरात गरिबीचे वास्तव्य असते. घरात अशांतता पसरते आणि कुटुंबातील सदस्यांवर कर्जाचा डोंगर वाढतो. अंथरुणावर बसून जेवल्याने धनहानी सहन करावी लागते.
वास्तुनुसार जेवणाचे नियम
- वास्तूनुसार नेहमी जमिनीवर बसून सावकाश जेवावे. जर तुम्हाला बसता येत नसेल तर जेवणाच्या टेबलावर बसून जेवा, पण जेवणाचे ताट हातात धरून जेवू नये हे लक्षात ठेवा. यामुळे धनाची हानी होत नाही असे मानले जाते. वास्तूनुसार जेवण नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून करावे. किचनमध्ये खरकटी भांडीही ठेवू नयेत. हा माता अन्नपूर्णाचा अपमान मानला जातो. भांडी नेहमी रात्री धुवावीत, किंवा ती घराबाहेर ठेवावी त्यामुळे धनहानी होत नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)