मुंबई : आयुष्यात अशी व्यक्ती क्वचितच असेल, ज्याला श्रीमंत व्हायला आवडणार नाही, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होत नाही. यासाठी लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. या दोघांना संतुष्ट करण्यासाठी प्रत्येक मनुष्य आपापल्या परीने प्रयत्न करतो. वास्तुशास्त्रामध्ये (Vastu Tips) अशा 5 गोष्टींचे वर्णन केले आहे, त्यांना घरी आणल्याने माता लक्ष्मी आणि कुबेर देव आपोआप तुमच्या घराकडे खेचले जातात. आज आम्ही तुम्हाला त्या पाच गोष्टींबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत. त्यांना तुमच्या घरी आणून तुमचे कुटुंब समृद्ध करू शकता. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी.
माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये 3 नाणी ठेवा. तुम्ही तुमच्या देवघरात लाल कापडात 3 नाणी ठेवू शकता. असे केल्याने भाग्यवृद्धी होते आणि संकटांपासून मुक्ती मिळते.
वास्तुशास्त्रानुसार, सुख, समृद्धी, संपत्ती आणि उत्तम आरोग्यासाठी तुम्ही माशाची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवू शकता. असे म्हटले जाते की या प्रकारची मूर्ती घरात शांती आणि समृद्धीचा मार्ग प्रशस्त करते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही भिंतीवर माशांची पेंटिंग देखील लावू शकता.
धार्मिक विद्वानांच्या मते, धनलाभासाठी तुम्ही घरातील ईशान कोपऱ्यात अष्टदल कमल बनवून मंगल कलशाची स्थापना करू शकता. नंतर तो कलश पाण्याने भरून त्यात तांब्याचे नाणे टाकावे. हा उपाय खूप प्रभावी आहे.
माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कौड्या हळदीच्या द्रावणात किंवा केशरमध्ये भिजवून वाळवा. यानंतर, जेव्हा त्या कौड्यांचा रंग पिवळा होईल तेव्हा त्यांना लाल कपडात बांधून ठेवा आणि घराच्या तिजोरीत ठेवा. शास्त्रानुसार, पिवळी कौडी ही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. ती घरात ठेवल्याने पैसा चुंबकासारखा आकर्षीत होतो .
घरात पैशाचा ओघ वाढवण्यासाठी माता लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान गणेशाच्या मूर्ती पूजागृहात ठेवाव्यात. या तिन्ही देवतांची रोज योग्य विधीपूर्वक पूजा करावी. असे केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी वाढते आणि आनंद पसरू लागतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)