मुंबई : वास्तुशास्त्रात (Vastu Tips) अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि नकारात्मक ऊर्जेचा संचार कमी होतो. वास्तू तज्ञ सांगतात की घरात कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी एक निश्चित जागा आणि दिशा असते. या दिशांची काळजी घेतल्यास घरातून नकारात्मकता नष्ट होते. वास्तुशास्त्रानुसार जोडे आणि चप्पल योग्य ठिकाणी ठेवावे असेही सांगण्यात आले आहे. त्यासाठी ठराविक जागा निश्चित केली आहे. जर एखाद्या व्यक्तीने हे नियम पाळले नाहीत तर घरातील आर्थिक संकट आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह वाढू लागतो. एवढेच नाही तर माणसाला आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. घरात शूज आणि चप्पल ठेवण्याबाबत काही महत्त्वाचे नियम जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार शूज आणि चप्पल कधीही तुळशी वृंदावनाजवळ ठेवू नयेत. तुळशीला हिंदू धर्मात देवीचे स्थान आहे यामुळे घरात गरिबी येऊ शकते आणि त्रासही वाढू शकतो. इतकंच नाही तर संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा संचारू लागते.
बेडरूममध्येही ठेवू नका
जोडे आणि चप्पल घरातील बेडरूममध्ये कधीही काढू नये. वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ मानले जाते. असे केल्याने पती-पत्नीचे नाते बिघडू लागते.
घराच्या मुख्य प्रवेशद्वासमोर ठेवू नका
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोडे आणि चप्पल कधीही काढू नयेत. यामुळे धनाची देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि दारातून परत जाते.
स्वयंपाकघरापासूनही अंतर ठेवा
जोडे आणि चप्पल स्वयंपाकघरात ठेवणे म्हणजे अन्न आणि अग्नि देवाचा अपमान करणे होय. त्यामुळे स्वयंपाकघरात चप्पल कधीही ठेवू नका.
शू रॅक ठेवण्यासाठी योग्य दिशा
वास्तुशास्त्रानुसार घरातील सर्व जोडे आणि चप्पल एकत्र करून शू रॅकमध्ये ठेवा. यानंतर शू रॅक घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवा. शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी ही दिशा शुभ मानली जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)