Vastu Tips : घराच्या या दिशेला चुकूनही बनवू नये शौचालय, करावा लागतो वास्तूदोषाचा सामना

| Updated on: Feb 09, 2024 | 6:56 PM

काही लोकांच्या घरांमध्ये ईशान्य दिशेला शौचालय बनवले जाते, हा मोठा वास्तुदोष आहे. ईशान्य दिशेला शौचालय बांधल्याने वास्तूदोष तर निर्माण होतोच पण त्या घरात येणारे शुभ प्रभावही कमी होतात. ईशान्य दिशेला शौचालय बांधल्यास इमारतीतील इतर घटकांवरही वाईट परिणाम होतो.

Vastu Tips : घराच्या या दिशेला चुकूनही बनवू नये शौचालय, करावा लागतो वास्तूदोषाचा सामना
वास्तूदोष
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : ईशान्य दिशा अत्यंत पवित्र मानली जाते, या दिशेला देवांचा वास असतो. घर बांधताना या दिशेला विशेष महत्त्व दिले जाते. या दिशेला चुकीचे बांधकाम झाल्यास घरात राहणाऱ्या सर्व लोकांना मानसिक तणाव आणि कोणत्या ना कोणत्या त्रासाला (Vastudosh) सामोरे जावे लागते. घरामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेले शुभ परिणाम खूप कमी होतील. ईशान्येला देवांचे स्थान मानले जाते. ईशान्य कोपऱ्यात शौचालय बनवल्यास तर घरात संकटे येतात. तुमच्या व्यावसायाच्या ठिकाणी किंवा तुमच्या घरात लोक आपापसात भांडायला लागतात. अशा परिस्थितीत ती व्यक्ती नैराश्याची शिकार होऊ लागते. त्यामुळे शौचालय बनवण्याची योग्य दिशा कोणती ते आपण जाणून घेऊया.

ईशान्य दिशेला काय असावे?

ईशान्य ही अतिशय शुभ दिशा आहे. या दिशेला बांधकाम करताना वास्तूशास्त्राची विशेष काळजी घ्यावी, त्यामुळे या ठिकाणी देवघर बांधणे उत्तम. या ठिकाणी पाणी साठविल्यास शुभ फळ मिळते. ज्या घरामध्ये ईशान्य दिशेला देवघर किंवा पाणी साठविण्याची जागा असते, ती वास्तू नेहमी शुभ प्रभावाखाली राहते आणि देवाची कृपाही असते.

शौचालय बांधू नका

काही लोकांच्या घरांमध्ये ईशान्य दिशेला शौचालय बनवले जाते, हा मोठा वास्तुदोष आहे. ईशान्य दिशेला शौचालय बांधल्याने वास्तूदोष तर निर्माण होतोच पण त्या घरात येणारे शुभ प्रभावही कमी होतात. ईशान्य दिशेला शौचालय बांधल्यास इमारतीतील इतर घटकांवरही वाईट परिणाम होतो. ईशान्य दिशेला शौचालय बांधल्यामुळे या ठिकाणचे पाणी अशुद्ध किंवा दूषित राहते.

हे सुद्धा वाचा

चंद्र कमजोर होईल

जल दूषित झाल्यामुळे चंद्राला अशुभ प्रभाव पडतो. ही स्थिती चंद्रग्रहण आणि चंद्राच्या प्रभावाखाली येण्याइतकीच अशुभ आहे. ज्याचा त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. मन नेहमी वाईट विचारांनी आणि अनावश्यक शंकांनी वेढलेले असते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)