Vastu Tips For Kitchen: वास्तूशास्त्रानुसार असे असावे स्वयंपाकघर, घरात नांदेल सुखसमृद्धी

| Updated on: Aug 13, 2022 | 1:24 PM

चुकीच्या दिशेने किंवा चुकीच्या पद्धतीने बनवलेले स्वयंपाकघर कुटुंबियांच्या आयुष्यात नकारात्मकता निर्माण करू शकते. त्यामुळे स्वयंपाकघर बांधताना आणि त्याचे इंटेरियर करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Vastu Tips For Kitchen: वास्तूशास्त्रानुसार असे असावे स्वयंपाकघर, घरात नांदेल सुखसमृद्धी
वास्तुशास्त्र टिप्स
Image Credit source: Social Media
Follow us on

Vastu Tips For Kitchen: हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तूशास्त्र (Vastu shastra in Marathi) हे प्राचीन काळापासून प्रचलित असलेले शास्त्र असून ते दिशांवर आधारित आहे. प्रत्येक दिशेची स्वतःची ऊर्जा असते. विशिष्ट दिशेला प्रवाहित होणारी ऊर्जा शरीराला प्रभावित करते. स्वयंपाकघर हा कोणत्याही घराचा महत्त्वाचा भाग असतो. वास्तूनुसार आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणण्यात घरातल्या स्वयंपाकघराचे विशेष योगदान असते. चुकीच्या दिशेने किंवा चुकीच्या पद्धतीने बनवलेले स्वयंपाकघर कुटुंबियांच्या आयुष्यात नकारात्मकता निर्माण करू शकते. त्यामुळे स्वयंपाकघर बांधताना आणि त्याचे इंटेरियर करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या वास्तूनुसार घराचे स्वयंपाकघर कसे आणि कोणत्या दिशेला असावे.

  1.  घराचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे. परंतु जर काही कारणास्तव या दिशेला स्वयंपाकघर बांधणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही ते उत्तर-पश्चिम दिशेलाही बांधू शकता. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार स्वयंपाकघर कधीही उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पश्चिम दिशेला बनवू नये.
  2. स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू जसे की गॅस, मायक्रोवेव्ह आणि टोस्टर उत्तर-पूर्व भागात ठेवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.
  3. वॉश बेसिन आणि पाण्याचे पाईप स्वयंपाकघराच्या ईशान्य कोपर्यात असावेत. वास्तूनुसार, यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि जीवनात समृद्धी येते.
  4. फ्रिज कुठल्याही दिशेला ठेऊ शकता. त्याचा वास्तूशास्त्राशी काहीही संबंध नाही.
  5. हे सुद्धा वाचा
  6. स्टोरेज कॅबिनेट म्हणजे ज्यामध्ये तुम्ही स्वयंपाकघरातील वस्तू ठेवणार आहात ते दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावे.
  7. स्वयंपाकघरात खिडक्या लावा, जेणेकरून हवा खेळती राहील. त्यामुळे स्वयंपाक घरातले वातावरण प्रसन्न राहील. तसेच स्वयंपाकघरातील भिंतींचा रंग पिवळा, लाल आणि केशरी असावा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)