Vastu Tips : आर्थिक समस्यांचा करत असाल सामना, तर वास्तूशास्त्रातले हे नियम अवश्य पाळा

| Updated on: Sep 27, 2023 | 3:10 PM

धातूचा कासव घरात ठेवल्याने आत्मविश्वास वाढवणारे मानले जाते. जर तुम्हाला कोणतेही नवीन काम करताना आत्मविश्वास कमी वाटत असेल, ज्यामुळे तुम्हाला अपयश येत असेल तर आजच एक धातूचे कासव घरी आणा.

Vastu Tips : आर्थिक समस्यांचा करत असाल सामना, तर वास्तूशास्त्रातले हे नियम अवश्य पाळा
वास्तूशास्त्र
Follow us on

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) घराच्या प्रत्येक भागात आणि प्रत्त्येक वस्तूत काही ना काही ऊर्जा असते ज्याचा प्रभाव घरातील लोकांवर पडतो. वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये सुख, संपत्ती आणि समृद्धी आणण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल किंवा खूप कर्ज असेल तर तुम्ही वास्तुचे काही सोपे उपाय अवलंबू शकता. यापैकी एक उपाय म्हणजे घरामध्ये कासव ठेवणे आहे. धातूचा कासव घरात ठेवल्याने आत्मविश्वास वाढवणारे मानले जाते. जर तुम्हाला कोणतेही नवीन काम करताना आत्मविश्वास कमी वाटत असेल, ज्यामुळे तुम्हाला अपयश येत असेल तर आजच एक धातूचे कासव घरी आणा. घरात ज्या घरात ठिकाणी तुम्ही जास्त वेळ घालवता त्या ठिकाणी कासव ठेवा. त्या कासवाला पाण्याने भरलेल्या एका मोठ्या भांड्यात ठेवा.

वास्तुशास्त्रानुसार आत्मविश्वास वाढवण्यासाठी उत्तर दिशेला धातूचे कासव ठेवा. कासव हे धनप्राप्तीचे सूचकही मानले जाते. जर तुम्हाला पैशाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही क्रिस्टल कासव आणून ते तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकता.

पैसा हातात टिकत नसेल तर अवश्य करा हे उपाय

वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही संपत्तीच्या आगमनाची दिशा आहे आणि जर या दिशेला जड वस्तू ठेवल्या गेल्या किंवा या ठिकाणी खूप घाण असेल तर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. घरात पैसा येण्याचा वेग मंदावतो. तसेच ईशान्य दिशेला सतत अंधार असेल तर कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढू शकतात. त्यामुळे या दिशेला नेहमी प्रकाश असावा. तसेच दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेला दरवाजा किंवा तिजोरी ठेवल्याने धन आणि जीवितहानी होते.

हे सुद्धा वाचा

या गोष्टी करतात पैश्यांना आकर्षित

मनी प्लांटसोबतच वास्तूमध्ये क्रॅसुला प्लांट देखील खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दोन्ही वनस्पती पैसे आकर्षित करतात. त्यांना कुबेरशी वनस्पती असेही म्हणतात. हे स्थापित केल्याने घरामध्ये धन प्रवेशाचा मार्ग खुला होतो.

घराची उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. वास्तूनुसार घराचे कपाट दक्षिणेला भिंतीला लागून अशा प्रकारे ठेवावे की त्याचा दरवाजा उत्तरेकडे उघडेल. त्यामुळे कुबेर देवासोबत लक्ष्मीचेही घरात आगमन होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)