Vastu Tips : घराच्या या दिशेला ठेवा हे रोपटं, चुंबकासारखा खेचला जाईल पैसा

| Updated on: Jul 06, 2023 | 6:25 PM

भारतीय वास्तूशास्त्रा प्रमाणेच चीनमध्येही एक शास्त्र प्रचलित आहे. त्याचे नाव फेनशुई आहे. या शास्त्रात झाडांना विशेष महत्त्व आहे. याचा थेट संबंध आर्थिक स्थितीसोबत असल्याचे सांगितल्या जाते.

Vastu Tips : घराच्या या दिशेला ठेवा हे रोपटं, चुंबकासारखा खेचला जाईल पैसा
क्रिस्टल ट्री
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : चिनी वास्तुशास्त्र (Vastu Shastra) फेंगशुईमध्ये घरामत सुख संमृद्धी नांदावी यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. फेंगशुईनुसार काही वस्तू घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते. यापैकी एक गोष्ट म्हणजे क्रिस्टल ट्री. फेंगशुईमध्ये क्रिस्टलचे झाड घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की घरात स्फटिकाचे झाड ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक प्रभाव दिसून येतात. फेंगशुईमध्ये अनेक प्रकारचे क्रिस्टल वृक्ष आहेत. क्रिस्टल ट्री रंगीबेरंगी रत्ने आणि स्फटिकांपासून बनलेले आहे. चला तर मग जाणून घेऊया घरात क्रिस्टल ट्री ठेवण्याचे काय फायदे आहेत.

क्रिस्टल ट्री घरी ठेवण्यापूर्वी नियम जाणून घ्या

  • फेंगशुई नुसार जर एखाद्या व्यक्तीच्या घरात आर्थिक चणचण भासत असेल किंवा ती व्यक्ती कर्जाखाली असेल तर या समस्येचा सामना करण्यासाठी घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला क्रिस्टलचे झाड ठेवणे शुभ राहील. त्यामुळे आर्थिक चणचण दूर होईल. यासोबतच कर्जमुक्तीही होईल.
  •  फेंगशुईनुसार, जर एखाद्या व्यक्तीला दीर्घ आजाराने त्रास होत असेल आणि त्याला यापासून मुक्ती मिळवायची असेल तर घराच्या पूर्व दिशेला क्रिस्टलचे झाड ठेवावे. यामुळे व्यक्तीचे आरोग्य सुधारेल.
  •  फेंगशुईनुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर बेडरूममध्ये क्रिस्टलचे झाड ठेवल्याने पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल.
  • फेंगशुईनुसार दिवाणखान्याच्या दक्षिण-पश्चिम दिशेला क्रिस्टलचे झाड लावणे शुभ मानले जाते. दिवाणखान्याच्या नैऋत्य दिशेला ठेवल्याने घरात सुख-शांती कायम राहते.
  • फेंगशुईनुसार, जर एखाद्या मुलाला अभ्यास करायला आवडत नाही. त्यामुळे मुलाच्या बेडरूममध्ये किंवा अभ्यासाच्या खोलीत ईशान्य कोपऱ्यात क्रिस्टलचे झाड ठेवणे फायदेशीर ठरेल. त्यामुळे एकाग्रता वाढते व मुलाचे मन विचलित होत नाही व परीक्षेत यश हाताशी असते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)