वास्तू टिप्स
Image Credit source: Social Media
मुंबई, प्रत्येकाच्याच घरात एक श्रद्धास्थान असते ज्याला आपण देवघर (Devghar) म्हणतो. वास्तुशास्त्रात (Vastushastra) देवघराला अत्यंत महत्त्व आहे. याशिवाय वास्तुशास्त्रात आपलं घर आणि त्याच्यातील वस्तुंबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात (Vastu tips in Marathi). त्याचं जर आपण पालन केलं तर, आपल्या घरी सुख, शांती आणि आनंद नांदते. वास्तुशास्त्र देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत. धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न झाली तर जीवन सुख-समृद्धीने भरून जाते. देवघरात काही विशेष गोष्टी ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
देवघरात या गोष्टी अवश्य असाव्या
- शंख – माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे. समुद्रमंथनात लक्ष्मीसोबत शंखही प्रकट झाला. देवघरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करते.
- मोरपंख – भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे, ते नेहमी डोक्यावर मोरपंख घालतात. घरामध्ये मोराची पिसे ठेवणे खूप शुभ मानले जाते. विशेषत: मोराची पिसे मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो.
- गंगा जल – हिंदू धर्मात गंगेचे पाणी अत्यंत मानले गेले आहे. असे म्हणतात की पवित्र पाणी कधीही खराब होत नाही. विशेष प्रसंगी पवित्र गंगा नदीत स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. जर हे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून आंघोळ केल्यास खूप फायदा होतो. यासोबतच मंदिरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होते.
- शाळीग्राम – शालिग्राम हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते. घरातील मंदिरात शालिग्रामची स्थापना अवश्य करा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. पण घरात एकच शाळीग्राम ठेवा, एकापेक्षा जास्त शाळीग्राम ठेवणे अशुभ आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)