मुंबई : निळ्या आभाळात मुक्त पणे संचार करणाऱ्या पक्षांनाही निवाऱ्याची गरज असते. कबुतर आणि चिमण्यांसारखे पक्षी बऱ्याचदा आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात घरटं बांधतात. शास्त्रानुसार पक्ष्यांचे घरटे बनवणे (Nest Astrology) शुभ किंवा अशुभ मानले जाते. आज जाणून घेऊया आपल्या घरी कबुतराने घरटे बनवणे शुभ आहे की अशुभ.
घरामध्ये कबुतराचे आगमन हे सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. परंतु जर कबुतर घरात कोपऱ्यात राहू लागले तर ते अशुभ मानले जाते. त्याचा अर्थ तुमच्या घरात गरिबी येण्याचा संकेत आहे. तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कबुतरांना घरात घरटी बनवू देऊ नयेत. आपल्या घरात किंवा आपल्या घराच्या आसपास त्यांचे घरटे असेल. तर वाऱ्यामुळे ती प्रदूषित हवा आपल्या घरामध्ये येते व या मुळे नकारात्मकता पसरते.
त्यामुळे कबुतरांचे घरटे हे शक्यतो बंद वाडे, मोठे मोठे किल्ले, ओसाड उजाड जागा अशा ठिकाणी असते. त्यामुळे त्यांच्या घरात येणे म्हणजे आपले घर ओसाड किंवा उजाड होण्याचा हा संकेत आहे. त्याबरोबरच घरात नकारात्मकता येण्याचा हा संकेत आहे. म्हणून शक्यतो आपल्या घराची रचना अशा प्रकारे करा की, कबुतरांना आपल्या घरात घरटे बांधणे शक्य होणार नाही.
त्याशिवाय आपण सार्वजनिक ठिकाणी ही कबुतरांना दाणे टाकतो. तेथे बरेच कबूतर जमतात व दाणे खातात व तेथेच घाण करतात. नंतर ते घाण वाळून पांढर्या पावडरचा थर जमा होतो आणि जोराने हवा आल्यास ही पांढरी पावडर उडते व श्वासाद्वारे आपल्या नाकात जाते. ज्यामुळे आपल्याला कितीतरी प्रकारचे आजार होण्याची दाट शक्यता असते.
पौराणिक शास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर कबुतरांना धान्य खाऊ घालावे. यामुळे बुध ग्रह मजबूत होतो आणि जीवनात प्रगती होते. घरात सुख-समृद्धी येते.
घराच्या गच्चीवर कबुतरांना धान्य घालताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण, असं करू नये. कबुतरांना नेहमी घराच्या अंगणामध्ये खायला द्यावे. त्यामुळे राहू ग्रहाचा दोष दूर होतो.
अशाप्रकारे लक्ष्मीजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही नेहमी कबुतरांना दाणे द्यावेत. यामुळे तुमच्या कुटुंबात शांतता राहते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. यासोबतच बुध ग्रह बलवान होतो आणि राहू ग्रहही शांत राहतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)