Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात दोन प्रकारची ऊर्जा असते, एक नकारात्मक आणि दुसरी सकारात्मक. नकारात्मक ऊर्जा ही घरात हळूहळू प्रवेश करते. यामुळे घरात वास्तुदोष (Vastu Dosh) निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा (Negative energy) जास्त असते तेव्हा कुटुंबियातील सदस्यांची प्रगती थांबते. यासोबतच धनहानी आणि आरोग्याशी निगडित अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. इतकंच नाही तर कुटुंबातील सदस्यांमधली मतभेद वाढून गृहकलह निर्माण होतो. वैवाहिक जीवनातही एक प्रकारचा तणाव राहतो. वास्तुशास्त्रानुसार अशा असंख्य समस्यांपासून दूर राहण्यासाठी अशा काही वास्तू टिप्स आहेत ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बर्याच प्रमाणात दूर होऊ शकते. त्याबद्दल जाणून घेऊया.
देवाची आरती करण्यासोबतच घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील कापूर खूप मदत करतो. यासाठी रोज सकाळी एका छोट्या निरांजणीत कापूर पेटवा आणि संपूर्ण घरात फिरवा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल.
तुळशीला पवित्र वनस्पतींपैकी एक मानले जाते. असे मानले जाते की ज्या ठिकाणी हिरवे तुळशीचे रोप असते, ज्या ठिकाणी माता लक्ष्मी स्वतः वास करते. यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जा राहते.
हिंदू धर्मात पूजा किंवा आरती करताना टाळी वाजवण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की टाळ्या वाजवल्यानेही घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)