मुंबई : सुखी आणि शांत जीवन जगण्यासाठी घरात पाच घटकांचे संतुलन असणे आवश्यक आहे. घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या ना कोणत्या घटकाचे प्रतिनिधित्व करते. वास्तूनुसार (Vastu Tips) घराची रचना केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि कुटूंबीय निरोगी, आनंदी आणि धनवान बनतात. वास्तु सिद्धांतानुसार, तुमच्या घराची अंतर्गत सजावट वास्तू दोष दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. घरामध्ये शांती आणि सौहार्द राखण्यासाठी काही वास्तु नियमांचा अवलंब केला जाऊ शकतो.
घरामध्ये पूजा कोणत्या दिशेला होते हे खूप महत्वाचे मानले जाते. देवघर खोलीच्या योग्य दिशेने नसल्यास किंवा इतर कोणतीही अवजड वस्तू ठेवल्यास त्याचा घरावर खूप नकारात्मक प्रभाव पडतो. मनःशांती आणि घराच्या सर्वांगीण विकासासाठी पूजास्थान ईशान्य दिशेला दिशेला असावे. कारण हे देवतांचे स्थान आहे. तसेच पूजेच्या खोलीच्या वर किंवा खाली कधीही शौचालय, स्वयंपाकघर किंवा पायऱ्या असू नयेत हे लक्षात ठेवा.
पुरेसा पैसा कमावूनही तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या हातात पैसा थांबत नाही, तर तुम्हाला तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला निळा रंग काढून टाकावा लागेल. या दिशेने हलका केशरी, गुलाबी रंग वापरा. घरातील जाळे, धूळ आणि घाण वेळोवेळी काढून टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. पार्किंगसाठी उत्तर-पश्चिम स्थानाचा वापर करणे शुभ मानले जाते.
कुंड्यांमध्ये लावलेल्या झाडांना नियमित पाणी द्यावे. कोणतेही रोप सुकले तर ते ताबडतोब काढून टाकावे.
दक्षिण-पश्चिम दिशेला ओव्हरहेड पाण्याच्या टाकीची व्यवस्था करणे फायदेशीर आहे.
दरवाजा उघडताना आणि बंद करताना काळजीपूर्वक बंद करा, जेणेकरून खडखडाट आवाज येऊ नये.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)