मुंबई : हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानले जाते. असे म्हटले जाते की लक्ष्मी देवी प्रसन्न असेल तर पैशाची कमतरता भासत नाही आणि घर सुखाने भरलेले राहते. मात्र, देवी लक्ष्मी कोपली तर त्या घरात समस्या निर्माण होऊ लागतात आणि त्या घरात गरिबीचे वास्तव्य सुरू होते. त्यामुळे देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध प्रकारची पूजा करतात. लोकं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर राहावा यासाठी प्रयत्न करतात. ज्योतिष शास्त्रानुसार आणि वास्तूशास्त्रानुसार (Vastushastra) काही काम संध्याकाळी करू नये. असे केल्याने धनाची देवी लक्ष्मीचा कोप होतो. चला जाणून घेऊया त्या सर्व कामांबद्दल जे संध्याकाळी करणे अशुभ मानले जाते.
मान्यतेनुसार संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर झोपणे अशुभ आहे. असे मानले जाते की यावेळी देवी-देवता दर्शनासाठी बाहेर पडतात आणि आशीर्वाद देतात, यावेळी जो झोपतो तो त्यांच्या आशीर्वादापासून वंचित राहतो. तसेच संध्याकाळी झोपल्यामुळे माता लक्ष्मीचा कोप होतो.
हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. संध्याकाळी पाणी अर्पण करणे आणि तुळशीला स्पर्श करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. असे केल्याने धनाची देवी लक्ष्मीचा कोप होतो.
संध्याकाळी घराची साफसफाई करणे, झाडू मारणे, पुसणे हे देखील अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की संध्याकाळी झाडू किंवा पुसणे देवी लक्ष्मीला नाराज करते आणि यामुळे घरात दारिद्र्य येते.
संध्याकाळच्या वेळी दूध, दही, लसूण, कांदा, हळद आणि मीठ हे कोणाकडूनही घेऊ नयेत व कोणालाही देऊ नयेत. संध्याकाळी या वस्तू घेणे किंवा देणे अशुभ मानले जाते.
संध्याकाळी कोणत्याही प्रकारचे पैशाचे व्यवहार टाळा. संध्याकाळ ही देवी लक्ष्मीच्या घरी स्वागताची वेळ आहे, म्हणून यावेळी कोणालाही उधार देऊ नका किंवा पैसे घेऊ नका. असे केल्याने आर्थिक संकटाला आमंत्रण मिळते.
संध्याकाळी घराचे मुख्य गेट उघडे ठेवा. धार्मिक मान्यतांनुसार, असे मानले जाते की देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते, म्हणून घरामध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्य दरवाजा उघडा ठेवावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)