वास्तूशास्त्र
Image Credit source: social Media
मुंबई : वास्तुशास्त्रामध्ये (Vastu tips) घरासोबतच स्वयंपाकघराशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. हिंदू धर्मात अन्नाला देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. स्वयंपाकघराशी संबंधित काही नियमांचे पालन केल्यास देवी-देवता प्रसन्न होतात. यासोबतच घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. धार्मिक शास्त्रांमध्ये अन्नाचा आदर करण्याची शिकवण देण्यात आलेली आहे. ज्या घरात अन्न शिजवले जाते आणि नियमांचे पालन करून जेवले जाते, तेथे प्रगती होते. घरात धाण्याची कधीही कमतरता भासत नाही. जाणून घेऊया अन्न शिजवताना आणि जेवताना कोणते नियम पाळले पाहिजेत.
अन्नाशी संबंधीत हे नियम अवश्य पाळा
- जेवण बनवताना मन शुद्ध ठेवावे. नकारात्मकता आणि घाणेरडेपणाने बनवलेले अन्न कधीच चवदार नसते. असे अन्न सेवन केल्याने व्यक्ती आजारांना बळी पडते. त्याच्या मनावर आणि विचारावर विपरीत परिणाम होतो.
- जेवणापूर्वी देवतेचे आभार मानावे, कृतज्ञता व्यक्त करावी. यासाठी हिंदू धर्मात अन्न मंत्रही सांगण्यात आला आहे. जेवणापूर्वी भोजन मंत्राचा जप करावा.
- ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु।
सह वीर्यं करवावहै। तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै॥
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:।३।
- अर्थ- हा अतिशय प्रसिद्ध मंत्र जो शाळांमध्ये शिकवला जातो. कथो उपनिषदातील हा श्लोक आहे. या मंत्राचा अर्थ असा की हे सर्व रक्षणकर्ता देवा ! आम्हा दोघांचे (गुरू आणि शिष्य) रक्षण करा. आम्हा दोघांना एकत्र पालन करा. आम्हा दोघांनाही बळ मिळो. आम्हा दोघांनी घेतलेले शिक्षण मंगलमय होवो. आम्ही कधीही एकमेकांचा मत्सर करू नये.
- अन्न नेहमी शुद्ध आणि स्वच्छ ठिकाणी तयार केले पाहिजे. अपवित्र ठिकाणी बनवलेले अन्न कधीही सेवन करू नये.
- जेवताना पूर्व दिशेला तोंड करूनच अन्न घ्यावे. याशिवाय करिअरमध्ये प्रगतीसाठी किंवा पैसा मिळविण्यासाठी तुम्ही पश्चिम दिशेला तोंड करून जेवू शकता.
- हिंदू धर्मात अन्नदानाला खूप महत्त्व आहे. वेळोवेळी अन्नदान करा जेणेकरून घरात आशीर्वाद राहतील आणि धन-धान्य भरले जाईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)