ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सुख, वैभव, ऐश्वर्य आणि उपभोगाचा कारक मानला गेला आहे. शुक्राच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या संक्रमणाला शुक्र राशी परिवर्तन (venus transit 2022) म्हणतात. जन्मपत्रिकेत शुक्रदेव उच्च स्थानावर असल्यास त्या व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होतात असे म्हटले जाते. यावेळी 18 जून रोजी शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत प्रवेश करेल. शुक्राचे राशी परिवर्तन अनेक राशींचे भाग्य उजळवू शकते. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळेच व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि वैवाहिक सुख प्राप्त होते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला भौतिक सुखसोयी, वैवाहिक सुख, ऐषोआरामाची वस्तू आणि कीर्ती, सौंदर्य, प्रणय इत्यादी कारक मानले गेले आहे. शुक्र हा तूळ आणि वृषभ राशीचा स्वामी आहे, तर मीन हा शुक्राचा उच्च राशीचा मानला जातो. तर कन्या ही या ग्रहाची दुर्बल राशी असल्याचे सांगितले जाते.
- मेष- शुक्र 18 जून रोजी वृषभ राशीत प्रवेश करेल आणि 13 जुलैपर्यंत या राशीत राहील. याचा प्रभाव मेष राशीच्या लोकांसाठी जीवनात शुभ राहील. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळू शकते आणि पैसा मिळू शकतो. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल.
- वृषभ- 18 जूनपासून वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते.
- कर्क- शुक्राचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणेल. शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शुक्राची स्थिती तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बढती देऊ शकते. याचा व्यापाऱ्यांना फायदा होईल.
- सिंह- शुक्राचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकते. जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. या काळात तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.
- कन्या- कन्या राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. मुलाच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते.
- वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण लाभदायक ठरेल. या दरम्यान तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)