Vijaya Ekadashi 2023: विजया एकादशी 16 कि 17 फेब्रुवारीला, जाणून घ्या पूजा विधी, कथा आणि महत्त्व

| Updated on: Feb 11, 2023 | 9:46 PM

Vijaya Ekadashi 2023: दरवर्षी विजया एकादशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला येते. मात्र यावर्षी एकादशीच्या तारखेवरून संभ्रम निर्माण झाला आहे. चला जाणून घेऊयात नेमकी तारीख मुहूर्त आणि पूजा विधी

Vijaya Ekadashi 2023: विजया एकादशी 16 कि 17 फेब्रुवारीला, जाणून घ्या पूजा विधी, कथा आणि महत्त्व
विजया एकादशीला पूजन करून मिळवा भगवान विष्णुंची कृपा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Follow us on

मुंबई : माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी खास असते. या एकादशीला विजया एकादशी असं संबोधलं जातं. पद्म पुराणानुसार या दिवशी विधीवत पूजा विधान केल्यास व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. तसेच सर्वच पापातून मुक्ती मिळते.या एकादशी व्रतामुळे वाजपेय यज्ञाच्या तुलनेत फळ मिळतं आणि शत्रूपीडा नष्ट होते. या व्रतामुळे यशप्राप्तीचे मार्ग खुले होतात. मात्र यावर्षी एकादशीच्या तारखेवरून बराच गोंधळ निर्माण झाला आहे. कुठे एकादशी 16 फेब्रुवारीला, तर कुठे 17 फेब्रुवारीला असल्याचं सांगितलं जात आहे.पंचांगानुसार एकादशीचा प्रारंभ 16 फेब्रुवारीला सकाळी 5 वाजून 33 मिनिटानी सुरु होते आणि 17 फेब्रुवारी मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांपर्यंत आहे. उदय तिथीनुसार विजया एकादशी 16 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. गृहस्थ आणि वैष्णव संप्रदायातील लोकांनी 16 फेब्रुवारीला व्रत करावं.तसेच पारण 17 फेब्रुवारील सूर्योदयाच्या 2 तासाआधी करणं उत्तम राहील.

विजया एकादशी मुहूर्त

  • एकादशी तिथी प्रारंभ- 16 फेब्रुवारी, सकाळी 5 वाजून 33 मिनिटांपासून
  • एकादशी तिथी समापन- 17 फेब्रुवारी सकाळी 2 वाजून 50 मिनिटांपर्यंत
  • एकादशी पारण तिथी- 17 फेब्रुवारी सकाळी 7 वाजून 5 मिनिटांपासून 12 वाजेपर्यंत

विजया एकादशीचं महत्त्व

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी असं संबोधलं जातं. एकादशीच्या नावावरून महत्त्व अधोरेखित होतं. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरला या व्रताचं महत्त्व सांगितलं होतं. भगवान राम यांनीही लंकेत प्रस्थान करण्यापूर्वी व्रत केलं होतं. या दिवशी भगवान विष्णुंसोबत देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख आणि समाधान प्राप्त होतं. तसेच जीवनातील नकारात्मकता दूर होते.

विजया एकादशी पूजन विधी

  • एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत संकल्प घ्या
  • भगवान विष्णुची पूजा करण्यापूर्वी पूजास्थळाची व्यवस्थित साफसफाई करा. तसेच त्या ठिकाणी गंगाजल शिंपडा.
  • भगवान विष्णुंची मूर्ती त्या ठिकाणी विधीवतपणे स्थापित करा.त्यानंतर समोर तुपाचा दिवा लावा.
  • पूजा करताना भगवान विष्णुंना चंदन, फूल आणि रोली आदी समर्पित करा. प्रसाद म्हणून भगवान विष्णुंना गोड पदार्थ दाखवा.
  • भगवान विष्णुंना तुळस खूप प्रिय आहे. त्यामुळे विष्णुंना तुळसीचं पान आवर्जून वाहा.
  • एकादशीला चुकूनही भात खाऊ नका.घरातील एखाद्या सदस्याच्या व्रत नसेल तरीही घरी भात करू नये.
  • विजया एकादशीला गुरुवारचाही योग जुळून आला आहे. गुरुवार आणि एकादशी हे दोन्ही दिवस श्री हरिच्या उपासनेसाठी शुभ आहेत. अया दिवशी केळी,पिवळे वस्त्र आणि पिवळ्या मिठाईने भगवान विष्णूची पूजा करावी.