श्री गणेश
Image Credit source: Social Media
मुंबई, हिंदू धर्मात श्रीगणेशाला (Ganpati) विघ्नहर्ता म्हणतात, तसेच काेणत्याही शुभ कार्याच्या सुरवातीला सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. यामुळे सर्व कार्य निर्वीघ्न पार पडते, तसेच श्रीगणेशाचा आशीर्वाद कायम साेबत राहताे. काही निवडक राशी (Horoscope) आहेत, ज्यांच्यावर त्यांचा विशेष आशीर्वाद कायम राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) गणपतीची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि त्यांना श्री गणेशाची कृपा लाभते. दुसरीकडे, ज्या राशीच्या लोकांवर गणेशाची विशेष कृपा राहते, त्या तीन विशेष राशी म्हणजे मेष, मिथुन आणि मकर. चला तर मग जाणून घेऊया या राशीच्या लोकांना काेणती शुभ फळ मिळतात.
या राशी आहेत श्री गणेशाच्या प्रिय राशी
- मेष: मेष राशीचा समावेश या राशीमध्ये होतो ज्यांना भगवान गणेशाचा विशेष आशीर्वाद मिळतो. या राशीचे लोकं खूप हुशार आणि कुशाग्र. हे लोकं आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर भरपूर यश मिळवतात आणि चांगले उद्योगपती म्हणून सिद्ध होतात. या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नसते. मेष राशीच्या लोकांनी दररोज गणेशाची पूजा करावी आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
- मिथुन: मिथुन राशीचे लोकं खूप कुशाग्र असतात. या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात भरपूर यश मिळते आणि ते जिथे जातात तिथे त्यांचा प्रभाव कायम राहतो. ते उच्च पदावर राहतात आणि जीवनातील प्रत्येक आनंदाचा आनंद घेतात. हे लोकं नेहमी अभ्यासात पहिले येतात. या लोकांवर विजय मिळवणे कठीण आहे. या लोकांनी दररोज गणेशाची पूजा करावी.
- मकर: मकर राशीचे लोकं खूप मेहनती असतात, तसेच ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्व कामं मार्गी लावतात. या राशीचे लोकं शैक्षणिक क्षेत्रात आपले नाव कमावतात. या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवला जाऊ शकतो. मकर राशीच्या लोकांनी दररोज श्रीगणेशाचे ध्यान करावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)