मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक (Weekly Horoscope in Marathi), मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न व त्यातील सातत्य तेवढेच परिणाम करतात हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून, या सप्ताहात न कंटाळता कार्यरत राहणे गरजेचे राहील. ठरवलेली उद्दिष्टे साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने, चिकाटीने प्रयत्न करावे लागतील. अपेक्षित यश संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावधगिरी बाळगा. पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग येतील. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करताना वरिष्ठांची मर्जी सांभाळा. व्यवसायात वृद्धीच्या संधी चालून येतील जोडीदाराबरोबर वादविवाद टाळावेत. मित्रमैत्रिणी व इतर प्रलोभने यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.
या सप्ताहात शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त ताणघेऊ नका. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. मंगळ लग्नस्थ संताप आणि चिडचिड निर्माण करेल.तसेच या आठवड्यात खर्चावर नियंत्रण कराव लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. मात्र स्वतंत्र व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. कमिशनचे व्यवसाय, जाहिरात क्षेत्र,मीडिया क्षेत्र, कला क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता आहे. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. दशमातील शुक्र-शनी युती कलाकारासाठी फायदेशीर ठरणार आहे.या सप्ताहात जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. राहू व्यय स्थानातून भ्रमण करीत असल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. उष्णतेचे विकार, डोकेदुखी उद्भवेल.
कर्तृत्वाला उजाळा देणारा, महत्त्वाकांक्षा नोकरी कामात बदलाची संधी. या बदलाबरोबरच सत्ता,अधिकार मिळणार आहे आणि आर्थिकफायदाअशतः वाढणार आहे.वरिष्ठांशी मतभेद टाळणे गरजेचे राहील. ऑफिसमध्ये वागण्या-बोलण्यामुळे सहकारी वर्गात गैरसमज होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी कष्ट वाढणार आहेत. मात्र घेतलेल्या कष्टाचे अपेक्षित फलितही या प्राप्त होईल. व्यवसायात आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. नवीन करार अथवा योजना 15 तारखेनंतर मार्गी लागतील. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत. आर्थिक आवक वाढणार आहे, जमीन, स्थावर यात गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या.तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जोडीदाराला प्रवासाचे योग येतील. त्याला त्याच्या कार्यक्षेत्रात प्रगती करता येईल. प्रेमिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. प्रियकराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या अथवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. लेखकवर्ग, संपादन, कलाकार यांच्याकडून उत्तम कलेची निर्मिती होईल. पोटाचे विकार, हृदयविकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. कालावधीत डोळ्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अष्टमस्थ शनी अपघात भय दर्शवतो.
नवीन स्वतंत्र व्यावसायिकांसाठी खन्याअर्थाने सफलता देणारा काळ ठरेल. भाग्यस्थानातील गुरू शुभ फलदायी ठरेल. ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. नफ्यात वाढ होईल. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. आर्थिक उत्कर्षाचा साप्ताहिक कालखंड आहे. विवाहितांना जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला मार्गदर्शक आणि व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी ठरणार प्रेमिकांना अपेक्षित प्रतिसादासाठी प्रिय व्यक्तीचे मन वळवावे लागेल. संततीने घेतलेल्या मेहनतीचे चीज झालेले दिसेल. मुलांचे समाजात, त्यांच्या क्षेत्रात कौतुक होईल. संततीला परदेश प्रवासाच्या संधी येतील. मनाचा निश्चय सोडू नका. नकारात्मक विचार दूर ठेवा. लाभ स्थानातील मंगळ रिअल इस्टेट, जमीन, जागा खरेदी विक्रीकरता लाभदायी सिद्ध होईल आरोग्यविषयक या काळात पाठदुखीचा, रक्तदाबाचा अचानक त्रास संभवतो.
आपली तत्त्वे जपत कार्यरत राहणे हा सिंह राशीचा स्वभाव आहे. मात्र त्याला या महिन्यात थोडी मुरड घालावी लागेल. ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वास,प्रयत्न याचबरोबर इतरांचे सहकार्य देखील महत्त्वाचे असते, हे पटवून देणारा कालावधी आहे.या महिन्यात डोके शांत ठेवून पुढे जावे लागणार आहे. अडचणींना तोंड द्यावे लागेल, कामे लांबणीवर पडतील परंतु उद्दिष्टपूर्तीचा आनंद मिळणार आहे. नोकरीत वरिष्ठांशी वादविवाद टाळा. स्पष्ट बोलण्यावर नियंत्रण ठेवणे तसेच गरजेपेक्षा जास्त न बोलणेच उत्तम. नोकरीत जबाबदाऱ्या वाढणार आहेत, पण त्या पेलण्याची क्षमताही राहील. हाताखालच्या माणसांकडून काम करून घेताना प्रेमाचे व सबुरीचे घोरण ठेवावे लागणार आहे. जुनी आर्थिक येणी अचानक वसूल होतील, घर, जमिनीच्या देण्या-घेण्याच्या व्यवहारातून लाभ. शेअर्स, छोट्या मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन वास्तु अथवा स्थावर यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी अजून काही काळ थांबणे गरजेचे आहे. विवाहितांनी जोडीदाराबरोबर बोलता-वागताना टोकाची भूमिका घेणे टाळायला हवे. जोडीदाराला प्रवासाचे योग असले तरी आरोग्याची चिंता मात्र निर्माण होऊ शकते. संततीसौख्यासाठी ग्रहांची अनुकूलता आहे. संततीला यश, प्रसिद्धीचे योग.संततीचे आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे.प्रिय व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल.शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी. अनुकूल काळ आहे. मूत्रपिंडाशी संबंधित तसेच पोटाचे आणि मणक्याचे विकार असणाऱ्यांनी काळजी घेणे, व्यायाम करणे गरजेचे आहे.
जोडीदारांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरणार आहेत.त्याचे सल्ले निर्णायक ठरतील नोकरीत कनिष्ठ सहकान्यांशी समजुतीचे धोरण स्वीकारावे लागेल अन्यथा अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. नोकरदारांसाठी हा काळ दगदग व मानसिक त्रास वाढवणारा. नोकरीत बदल करण्याच्या संधी वा मुलाखती लांबणीवर पडतील. स्वतंत्र व्यावसायिकांची मध्यस्थांच्या मदतीतून मार्गी लागतील. ठरवलेले संकल्प पूर्ण करण्याकरता तुमचा भागीदार व वैवाहिक जोडीदार या दोघांची उत्तम साथ मिळणार आहे. व्यवसाय वृद्धीची संधी मिळेल. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील.आर्थिक तेजीचा सप्ताह आहे. जुनीयेणी वसूल होतील. नोकरी-व्यवसायातून अपेक्षित फायदा होणार आहे. स्थावराशी संबंधित अथवा सरकारी कामे कालावधीत मार्गी लागतील. घर, वाहन खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. सप्तमस्थानात गुरू असल्याने वैवाहिक जोडीदाराचा सल्ला, त्याचे वर्चस्व मान्य करावे लागेल. यशामुळे तुमचे समाजातील वजन वाढणार आहे. त्यात तुमच्या जोडीदाराचा वाटा महत्त्वाचा असेल. संशोधकांनी काळात घेतलेली मेहनत पुढील काळ फलदायी ठरेल.
या आठवड्यात मेहनत वाढवावी लागणार आहे. कलासक्त,न्यायप्रिय व भावनिक असणार्या या राशीच्या व्यक्तीने मित्रमैत्रिणी व इतर प्रलोभने यांच्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. प्रतिकूल परिस्थिती सावधानतेने हाताळावी लागते.काही अडचणींना सामोरे जायचे आहेआणि यासाठी सोशिकपणा, संयम हे तुमचे गुण उपयोगी पडणार आहेत. या त्रासदायक काळात वादविवाद टाळा. दुसऱ्यांना दुखवणे तुम्हाला जमत नाही पण या प्रतिकूल काळात मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबरतुमच्या वागण्या- बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीतयाची विशेष काळजी घ्या.नोकरीत अचानक बदल घडतील. वातावरण बदलणार आहे. पण बदल नजीकच्या पुढच्या काळासाठी फायदेशीर ठरणार आहेत. नोकरीत आपली मते दुसऱ्यांवर न लादता प्रेमाने वागून इतरांचे सहकार्य मिळवावे लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळल्याशिवाय अपेक्षित प्रगती करता येणार नाही. काळात मेहनत वाढवावी लागणार आहे. मित्रमैत्रिणी व इतर प्रलोभने यांच्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. सोशिकपणा, संयम हे तुमचे गुण उपयोगी पडणार आहेत. या त्रासदायक काळात वादविवाद टाळा. दुसऱ्यांना दुखवणे तुम्हाला जमत नाही. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर तुमच्या वागण्या- बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. पहिल्या पंधरवड्यात नोकरीत अचानक बदल घडतील. वातावरण बदलणार आहे. पण बदल नजीकच्या पुढच्या काळासाठी फायदेशीर ठरणार आहेत. नोकरीत आपली मते दुसऱ्यांवर न लादता प्रेमाने वागून इतरांचे सहकार्य मिळवावे लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळल्याशिवाय अपेक्षित प्रगती करता येणार नाही. मनाप्रमाणे लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही. मात्र नाउमेद होऊ नका.
तुमच्या कृतीमुळे लोकांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत अधिकार, सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र नोकरीत बदलाच्या संधी लांबणीवर पडतील.व्यावसायिकांना प्रगतीचा काळ आहे. कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. प्रेमात पुढे जाताना, धाडसी निर्णय घेताना घरातील व्यक्तीला विश्वासात घ्या.लेखक व कलाकारांकडून उत्तम कलानिर्मितीहोईल, प्रसिद्धीचे योग येतील.रक्तदाब व मेंदूशीसंबंधित विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.
प्रगतीकारक सप्ताह असणार आहे आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करण्यासाठी ग्रहांची अनुकूलता आहे. हितशत्रू अर्थात गुप्तशत्रू पासुन सावध राहावे. सुसंवाद, विश्वास असेल तरच आपली माणसे सुख-दुःखात आपल्याबरोबर असतात. त्यामुळे घरातील वातावरण बिघडणार नाही, नात्यांमध्ये गैरसमज होणार नाही याची खबरदारी घ्यावी. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीतील वातावरण चांगले राहील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. बरोबरचे सहकारी कामात उत्तम साथ देतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. प्रॉडक्शन अथवा मॅन्युफॅक्चरिंगचे व्यवसाय करणाऱ्यांना विशेष फायदा होईल. भागीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. अचानक खर्च वाढतील.कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. घर, वाहन खरेदीचे योग येतील. विवाहितांनी जोडीदाराबरोबर वादविवाद टाळावेत, टोकाची भूमिका घेऊ नये.
या आठवड्यात ठरलेल्या योजना मार्गी लागतील धडाडीने निर्णय घेतल्यास महत्वकांक्षा ठेवून परिश्रम केल्यास कार्यक्षेत्राची क्षितीजे विस्तृत झाल्याचे दिसून येईल.नवीन योजना, नवीन कामाच्या जबाबदाच्या वाढणार आहेत. योजना आखाव्या लागतील आणि त्या सहकाऱ्यांकडून पूर्ण करून घ्याव्या लागतील. बरोबरचे सहकारी, वरिष्ठ या दोघांची उत्तम साथ मिळेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल आणि आर्थिक लाभही वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांच्यामहत्त्वाकांक्षा वाढणार आहेत. प्रगतीकरण्यासाठी आव्हाने स्वीकारावीच लागतात हे तत्त्व लक्षात ठेवावे.कमिशनचे अथवा ट्रेडिंगचे व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे. व्यवसायातील फायदा वाढेल. व्यवसायानिमत्त प्रवासाचे योग येतील. नोकरी-व्यवसायातील लाभ, तसेच दीर्घ मुदतीची गुंतवणूक अथवा जमीन-स्थावराच्या व्यवहारातून उत्तम आर्थिक फायदा होईल. दानधर्म, पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्यावर खर्च करण्याची इच्छा निर्माण होईल. वैवाहिक जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. लेखकवर्गाकडून दर्जेदार लिखाण होईल व त्याचे कौतुकही होईल. पायाचे विकार, उष्णतेचे विकार,रक्तदाबाचे विकार त्रास देतील, परंतु जो आजार नियंत्रणात राहतील. जिभेवर नियंत्रण हवे. स्वप्ने बघितल्याशिवाय ती पूर्ण करण्याची इच्छा होत नाही. नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे, कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल, परंतु बोलण्यावर संयम ठेवा. स्पष्ट बोलणे टाळावे लागेल.
गेल्या काही कालखंडात शनीच्या साडेसतीच्या प्रभावाखाली असून ह्या राशीच्या व्यक्तींची ऐनकेन प्रकारे घुसमट होताना दिसते. ह्या महिन्यात शनी बदलाने कुंभेच्या व्यक्तीत बदल होईल. ठरवलेल्या योजनांना गती मिळणार आहे. कामाचा व्याप वाढणार आहे आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका.तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. आखलेले काही कालावधीत वेगाने मार्गीलागतील. कामातील मध्यस्थांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कनिष्ठ सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास होईल. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील आणि कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही वाढणार आहेत. नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल. परंतु बोलण्यावर संयम ठेवा. स्पष्ट बोलणे टाळावे. ठरवलेली कामे मार्गी लागतील. नवीन धोरणे, योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. स्थावराच्या देण्या-घेण्याचे व्यवहार मात्र चालू महिन्यात लांबणीवर टाकणेच उत्तम, इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजीघ्या. कारण नंतर पैसे वसूल होणे अवघड जाणार आहे आणि नात्यात-मैत्रीत वितृष्टता येईल. उच्च शिक्षण अथवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मेहनत वाढवावी लागेल. मार्गदर्शक किंवा शिक्षकांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी लागणारे धाडस कमी पड़ते आणि चुकीच्या मार्गाने जाणे तुम्हाला आवडत नाही, अशा अवघड काळात नाउमेद न होता मानसिक स्वास्थ्य सांभाळणे महत्वाचे आहे. प्रलोभने टाळा, दुसऱ्यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता खोल विचार करून, परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावेत. बोलण्यावर संयम ठेवा. तुमची मते कारण नसताना देऊ नका. नोकरीत सत्ता अधिकाराची पदे सांभाळतांना कठोर निर्णय घ्यावे लागतील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. मात्र हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. काळ बदलला की परिस्थिती बदलते, हे लक्षात ठेवा. व्यावसायिकांचे कष्ट, दगदग वाढणार आहे. व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी भागीदाराची मदत घ्यावी लागेल. त्याचा सल्ला ऐकावा लागणार आहे. व्यवसायासाठी प्रवास होतील. कौटुंबिक खर्च होईल. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कर्ज घेताना विचारपूर्वक कर्ज घ्यावेत. मनातील शंका दूर ठेवाव्या लागतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)