Chandrayaan-3: चंद्रयान मोहिमेच्या यशाबाबत ज्योतिषशास्त्र काय सांगते? जाणून घ्या

| Updated on: Aug 22, 2023 | 7:53 PM

चंद्रयान 3 मोहिमेची चर्चा संपूर्ण जगात सुरु आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. असं असताना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ही मोहीम यशस्वी ठरणार की नाही? त्याबाबत जाणून घ्या

Chandrayaan-3: चंद्रयान मोहिमेच्या यशाबाबत ज्योतिषशास्त्र काय सांगते? जाणून घ्या
Chandrayaan-3: चंद्रयान मोहीम ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने यशस्वी ठरणार की नाही? जाणून घ्या
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्र हे संपूर्ण ग्रहांच्या हालचालीवर अवलंबून आहे. हजारो वर्षांपूर्वी ग्रहांच्या मांडणीवरून ज्योतिषशास्त्र मांडण्यात आलं आहे. यात चंद्राचं महत्त्वही अधोरेखित करण्यात आलं आहे. चंद्राला ज्योतिषशास्त्रात मनाचा कारक असलेला ग्रह मानला जातो. अशात भारताच्या चंद्रयान मोहिमेकडे ज्योतिषशास्त्राचं लक्ष लागून आहे. 14 जुलैला चंद्राकडे झेपावलेलं चंद्रयान 3 यशस्वीरित्या पृष्ठभागावर उतरणार की नाही? याबाबत ज्योतिषशास्त्रात चर्चा सुरु आहे. चंद्रयानचं लँडर 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर लँड करणार आहे. चला जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रयान मोहिमेचं विश्लेषण

चंद्रयान 3 लग्न आणि मुहूर्त

इस्रोने 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटावरून चंद्रयान 3 चं लाँचिंग केलं होतं. यावेळी चंद्र वृषभ राशीत होता. दुसरीकडे जन्मकुंडलीनुसार चंद्रयान 3 ची लग्नरास वृश्चिक आणि लग्नस्वामी मंगळ दशम स्थानात शुक्रासोबत आहे. या स्थितीमुळे चंद्रयानाला बळ मिळेल अशी शक्यता आहे. कारण लग्नेशचं दशम स्थानात असणार आहे आणि तेथून लग्न आणि दशम स्थानाला मजबूत करते. त्यामुळे हे मिशन यशस्वी होईल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे.

ज्योतिष्यांच्या मते लाँचिंग वेळी भाग्यस्थानाचा स्वामी चंद्र सप्तम भावात बसून उच्च होता आणि चंद्र उच्च असल्याने चंद्रयानास बळ मिळणार आहे. तसेच ग्रह नक्षत्र या अभियानाच्या दृष्टीने योग्य आहेत. त्यामुळे चंद्रयान 3 ला यश मिळेल असं सांगण्यात येत आहे.

23 ऑगस्टला चंद्र तूळ राशीत असणार आहे. तसेच चंद्र नीच वृश्चिक राशीत रात्री 10 वाजून 20 मिनिटांपर्यंत राहील. त्यामुळे चंद्राचं लँडिंगसाठी रात्री 10.20 पर्यंतचा कालावधी उत्तम राहील. त्यामुळे चंद्रयान यशस्वीरित्या पृष्ठभागावर उतरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

चंद्रयानाच्या लँडिंगचं गणित फिस्कटलं तर काय?

चंद्रयान आपल्या ठरल्या वेळेनुसार 23 ऑगस्टलाच लँड होणार आहे. पण लँडिंगवेळी काही अक्रित घडलं तर मात्र ही तारीख 27 ऑगस्टपर्यंत वाढवली जाऊ शकते. विक्रम लँडर ज्या वेळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल तेव्हा त्याची गती 2 मीटर प्रति सेकंदच्या आसपास असेल. तसेच हॉरीझोंटल गती 0.5 मीटर प्रती सेकंद असेल. विक्रम लँडर 12 डीग्री उतरण असलेल्या उतारावर उतरू शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)