नव्या वर्षाला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. याच दरम्यान ब्राझीलचा प्रसिद्ध भविष्यवेत्ता ज्याला लिविंग नास्त्रेदमस च्या नावानं देखील ओळखलं जातं, असा एथोस सलोमे याने 2025 संदर्भात काही भविष्यवाणी केल्या आहेत. त्याच्या भविष्यवाणीनुसार येणारं नवीन वर्ष हे मानवाला मोठा झटका देणारं असून, तंत्रज्ञान क्षेत्रात लागलेल्या नवीन शोधाचा मोठा फटका हा मानवांना बसणार आहे.
काय आहे एथोस सलोमेची भविष्यवाणी?
34 वर्षीय एथोस सलोमची तुलना 16 व्या शतकातील महान भविष्यवक्ता नास्त्रेदमससोबत केली जाते. नास्त्रेदमस यांनी 16 व्या शतकामध्येच अनेक प्रसिद्ध भविष्यवाण्या केल्या होत्या. ती भविष्यवाणी त्यांच्या मृत्यूच्या चारशे वर्षांनंतरही खरी होताना दिसत आहे. एथोस सोलोमनच्या देखील अनेक भविष्यवाणी आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. ज्यामध्ये त्याने कोविड संदर्भात भविष्यवाणी केली होती, जगावर भयानक संकट येणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. सोबत युक्रेन आणि रशिया युद्धाबाबत देखील त्याने भविष्यवाणी केली होती. तसेच इंग्लंडच्या राणीच्या मृत्यूबद्दल देखील त्याने भाकीत वर्तवलं होतं. दरम्यान त्याने 2025 बद्दल त्याने अशाच काही भविष्यवाणी वर्तवल्या आहेत.
एथोस सलोमच्या भविष्यवाणीनुसार 2025 हे असं वर्ष आहे, ज्या वर्षात मानवी जीवनाला एक नवी दिशा मिळणार आहे. मानवी जीवन जेनेटिकली मॉडिफाइड बनण्याची ही सुरुवात आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये अनेक नवे शोध लागण्याची शक्यता आहे.
AI चा कब्जा – 2025 नंतर मानवाच्या जगण्याच्या व्याख्याच बदलून जातील. एआय तंत्रज्ञानात एवढी प्रगती होईल की प्रत्येक क्षेत्रात AI चा प्रभाव पाहायला मिळेल असं एथोस सलोमने म्हटलं आहे.
मानव निर्मिती संकट – एथोस सलोमच्या मते 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात मानव निर्मित संकटांचा सामना करावा लागू शकतो. प्रचंड प्रमाणात झालेल्या वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळेल. काही भागात पाऊसच पडणार नाही तर काही भागांमध्ये पाऊस इतका पडेल की अर्ध्या जगाला महापुराचा तडाखे बसू शकतो.
ऊर्जा संकट – एथोस सलोमने केलेल्या दाव्यानुसार 2025 मध्ये जागतिक ऊर्जा संकटाचा सामना करावा लागू शकतो. जे विकसीत देश आहेत, ते आपल्या ताकदीच्या जोरावर अधिकाधिक ऊर्जेचा वापर करतील याचा सर्वाधिक फटका हा विकसनशील देशाला बसेल.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)