मुंबई – ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे शनिदेव एकदा राशीत आले की, आपल्या कर्मानुसार फळं देतात. पंचांगानुसार शनि जयंती वैशाख अमावस्येला साजरी केली जाते. या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे. शनिदेव सूर्यदेव आणि छायादेवी यांचे पुत्र आहेत. तसेच यम आणि यमुना त्यांचे भाऊ बहीण आहेत. यंदा शनि जयंती 19 मे 2023 रोजी शुक्रवारी आहे.शनि जयंतीला विधीवत पूजा करू न साडेसाती, अडीचकी आणि महादशेच्या अशुभ प्रभावातून सुटका मिळवता येते.
वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी 18 मे रात्री 9 वाजून 42 मिनिटांनी सुरु होईल आणि 19 मे रोजी रात्री 9 वाजून 22 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार शनि जयंती 19 मे 2023 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी शोभ योग तयार होत आहे. हा योग शुभ कार्यासाठी चांगला मानला जातो. शनि जयंतीच्या दिवशी शोभन योग संध्याकाळई 6 वाजून 17 मिनिटांपर्यंत असेल.
शनिदेवांना न्यायदेवता संबोधलं गेलं आहे. शनिदेवांना नवग्रहांमध्ये प्रमुख स्थान प्राप्त आहे. सर्वात धीमा गतीने गोचर करणार शनि ग्रह आहे. महादशा, शनि साडेसाती आणि अडीचकीमध्ये सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे शनि जयंतीला खास उपास केल्यास फायदा होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)