मुंबई : जाणूनबुजून किंवा नकळत मानवी जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांमागे वास्तुमध्ये (Vastu tips) सांगितलेले नियमांचे उल्लंघन असू शकते. अशा अनेक वस्तू आहेत, ज्या विशिष्ट दिवशी किंवा वेळेवर खरेदी करणे निषिद्ध मानले जाते. विशेषतः जुने लोकं या बाबत अनेकदा टोकायचे. याचा परिणाम असा होतो की सर्व काही सुरळीत असतांना आयुष्यात अचानक समस्या येऊ लागतात आणि त्यामागचे कारण आपल्याला समजत नाही. यामध्ये आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ गोष्टींचा संबंध देखील आपण केलेल्या खरेदीशी असतो. त्यापैकी एक जोडे आणि चप्पल खरेदी आहे. कोणत्या दिवशी शूज आणि चप्पल खरेदी करावी आणि कोणत्या दिवशी खरेदी करू नये हे जाणून घेऊया
वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खरेदी करण्यास मनाई आहे. त्यापैकी एक म्हणजे पादत्राणे. प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार शूज आणि चप्पल खरेदी करतो, परंतु वास्तुशास्त्रानुसार, अमावस्या, मंगळवार, शनिवार किंवा ग्रहणाच्या दिवशी शूज आणि चप्पल खरेदी करणे टाळावे. ते त्यांच्यासोबत दुर्दैवही आणतात.
ज्योतिष शास्त्रानुसार शनीचा संबंध पायाशी मानला जातो, त्यामुळे शनिवारी शूज आणि चप्पल खरेदी करू नये असे सांगितले जाते. शनिवारी शूज आणि चप्पल खरेदी केल्यास शनिदोष व्यक्तीवर पडतो. यामुळे शनिदेव कोपतात आणि घरात दुःख आणि दारिद्र्य येते.
नवीन शूज आणि चप्पल खरेदी करण्याचा आणि परिधान करण्याचा योग्य दिवस देखील वास्तुशास्त्राने सांगितले आहे. शुक्रवारी नवीन शूज आणि चप्पल खरेदी करणे आणि ठेवलेले नवीन शूज आणि चप्पल शुक्रवारीच घालणे चांगले आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)