2023 मध्ये एलियन्स पृथ्वीवर येणार? बाबा वेंगा यांनी केल्या तीन मोठ्या भविष्यवाण्या

| Updated on: Dec 09, 2022 | 3:22 PM

बाबा वेंग यांच्या आतापर्यंतच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी 2023 या वर्षासाठी काही महत्त्वाच्या भविष्यवाण्या केल्या आहेत.

2023 मध्ये एलियन्स पृथ्वीवर येणार? बाबा वेंगा यांनी केल्या तीन मोठ्या भविष्यवाण्या
बाबा वांगा
Image Credit source: Social Media
Follow us on

बल्गेरिया, प्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगा हिने 2023 (Baba Vanga Prediction for 2023) सालासाठी काही मोठ्या भविष्यवाण्या केल्या आहेत. या भविष्यवाण्या थरकाप उडविणाऱ्या आहेत.  बाबा वेंगा यांनी काही दशकांपूर्वी केलेल्या भाकितानुसार 2023 मध्ये देशात आणि जगात अनेक मोठ्या घटना घडू शकतात. हा अंदाज खरा ठरल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. बाबा वेंगाच्या या भाकितांमध्ये पृथ्वीवर सौर वादळे येणे, पृथ्वीवर एलियन्सचे आगमन आणि अण्वस्त्रांचा वापर यांचा समावेश आहे. बाबा वेंगा यांनी 2023 या वर्षासाठी कोणकोणत्या भविष्यवाण्या केल्या आहेत ते जाणून घेऊया.

वर्ष 2023 साठी अंदाज

बाबा वेंगा यांच्या मते, 2023 मध्ये पृथ्वीवर एक धोकादायक सौर वादळ येऊ शकते. हे वादळ असे असेल की त्यामुळे पृथ्वीवर प्रचंड विध्वंस होऊ शकेल आणि असे वादळ याआधी कधीच पाहिलेले नसेल.

बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये अणुस्फोट होण्याची धोकादायक भविष्यवाणीही केली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या वारंवार दिलेल्या धमक्यांमुळे अणुबॉम्बच्या वापराची भीती बळावली आहे. साहजिकच या जैविक अस्त्रांचा वापर मानवजातीसाठी अत्यंत घातक ठरेल.

हे सुद्धा वाचा

बाबा वेंगा यांच्या मते, 2023 मध्ये एलियन्स पृथ्वीवर येऊ शकतात. याशिवाय बाबा वेंगा यांनी असेही सांगितले होते की, 2023 मध्ये मुलांना प्रयोगशाळांमध्ये विकसित केले जाईल.

80 टक्के अंदाज ठरले आहेत खरे

बाबा बेंगा यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला आणि 1996 मध्ये तिचा मृत्यू झाला. लहान वयातच वादळामुळे तिची दृष्टी गेली. बाबा वेंगा यांनी अनेक शतके भविष्यवाणी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार 2022 या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे 80 टक्के अंदाज खरे ठरले आहेत.