नव्या वर्षाला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येणारं वर्ष हे सुख, समृद्धी आणि आनंदाच्या दृष्टीनं अतिशय चांगलं असल्याचं मानलं जात आहे. मात्र येणारं वर्ष हे चांगलं जावं, कोणतंही संकट येऊ नये. येणाऱ्या वर्षात आपली प्रगती व्हावी यासाठी भविष्य शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. ज्यामध्ये नव्या वर्षात तुमच्या राशीसाठी कोणता रंग आणि नंबर शुभ असू शकतो याचा देखील समावेश आहे. राशी शास्त्रानुसार या रंगाचा आणि नंबरचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो असं मानलं जातं. जाणून घेऊयात तुमच्या राशीला नव्या वर्षात कोणता रंग आणि अंक शुभ आहे.
मेष रास – मेष राशीसाठी 2025 मध्ये लाल आणि सोनेरी कलर हा लकी असणार आहे. तसेच मेष राशीसाठी सात आणि नऊ नंबर लकी असणार आहे.
वृषभ रास – वृषभ राशीसाठी 2025 मध्ये सिल्वर कलर लकी ठरणार आहे. तर नबंर बाबत बोलायचं झाल्यास वृषभ राशीसाठी 6 आणि 9 हे दोन अंक लकी असणार आहेत.
मिथून रास – मिथून राशीसाठी नव्या वर्षात निळा आणि पोपटी कलर शुभ असणार आहे. तसेच 5 आणि 7 अंक शुभ असणार आहेत.
कर्क रास – कर्क राशीसाठी लाल कलर लकी असणार आहे तर 1 आणि 2 अंक शुभ असणार आहेत.
सिंह रास – सिंह राशीसाठी पिवळा आणि जांभळा कलर लकी ठरणार आहे. तर 1 आणि 7 हे अंक शुभ असणार आहेत
कन्या रास – कन्या राशीसाठी हिरवा कलर आणि निळा कलर लकी ठरणार आहे, तर 2 आणि 5 हे अंक लकी ठरणार आहेत.
तुळ रास – तुळ राशीसाठी सिल्वर कलर आणि तपकिरी कलर शुभ असून, 5 आणि 6 अंक शुभ असणार आहेत.
वृश्चिक रास – वृश्चिक राशीसाठी लाल आणि पांढरा कलर शुभ राहणार असून, 7 आणि 9 अंक शुभ असणार आहेत.
धनु रास – धनु राशीसाठी 2025 मध्ये ऑरेंज आणि सोनेरी कलर लकी ठरणार असून, 3,7 आणि 9 हे अंक शुभ असणार आहेत.
मकर रास – मकर राशीसाठी 2025 मध्ये राखाडी कलर लकी राहणार असून, 5 आणि 8 अंक शुभ आहेत.
कुंभ रास – कुंभ राशीसाठी निळा आणि काळा कलर शुभ असून, 5 आणि 8 हे अंक शुभ असणार आहेत.
मीन राशीसाठी 2025 मध्ये पिवळा आणि भगवा कलर शुभ असून,3, 6 आणि 9 अंक शुभ असणार आहेत.