मुंबई : शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून चांगला परतावा देणाऱ्या कंपन्या येऊ लागल्या आहेत. शेअर बाजारात अलीकडे गुंतवणूक वाढत असतांना त्याच्या परताव्याबाबत अनेकांना शंका असते. छोट्या-मोठ्या अनेक कंपन्यांचा तोटाही अनेकदा गुंतवणूक दारांना सहन करावा लागतो. त्यामुळे शेअर बाजारात होणारे चढ-उतार अनेकदा चर्चेचा विषय ठरत असतात. नुकतेच सन्मित इन्फ्रा स्टॉक या कंपनी तिच्या परताव्यावरुन चर्चेत आली आहे. सन्मित इन्फ्रा स्टॉक चार वर्षात मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात या कंपनीची चर्चा असून एक रुपयाच्या स्टॉकला 5900 टक्के इतका परतावा मिळाल्याने शेअर बाजारात चर्चेचा विषय ठरत आहे. सन्मित इन्फ्रा स्टॉक या कंपनीच्या 1 रुपये 31 पैशांच्या शेअर्सची किंमत 78 रुपये 75 पैशे इतकी झाली आहे. त्यामुळे गुंतवणूक दारांच्या नशिबाने कलाटणी घेतल्याचे बोललं जाऊ लागले आहे.
सन्मित इन्फ्रा स्टॉक या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मागील महिन्यात आठ टक्के इतकी वाढ झाली आहे. सन्मित इन्फ्रा स्टॉक या कंपनीच्या शेअर्सचा दर हा मागील महिन्यात फक्त 42 रुपये इतका होता.
सन्मित इन्फ्रा स्टॉक या कंपनीने सहा महिन्यात 90 टक्के इतका परतावा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात तब्बल 160 टक्के इतकी विक्रमी वाढ झाली आहे.
दरम्यान सन्मित इन्फ्रा स्टॉक लहान कॅप कंपनी आहे. मात्र, एक लाखाची ज्यांनी वर्षापूर्वी गुंतवणूक केली होती त्यांना आता 60 लाखाहून अधिकचा परतावा मिळाला आहे.
गुंतवणूक दारांनी चांगली फटकेबाजी केली असून शेअर्स बाजारात झालेल्या उसळणीचा चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत सन्मित इन्फ्रा स्टॉक या कंपनीच्या शेअर्सची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.