मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये आयुष्यमान भारत म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जाहीर केली. केंद्र सरकारद्वारे या योजनेत द्वितीय आणि तृतीय स्तरावरील रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यासाठी 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आलं आहे. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र, आयुष्यमान भारत योजनेची माहिती बऱ्याच जणांना माहिती नसते. आयुष्यमान भारत-प्राधनमंत्री जन आरोग्य योजनेविषयी माहिती असणं गरजेचे आहे. (Aayushyman Bharat Pradhanmantri Jan Aarogya Yojana know details how to apply for scheme)
आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेद्वारे 10.74 कोटींहून अधिक गरीब आणि वंचित कुटुंबाना मोफत उपचार करणे हा उद्देश आहे. यामध्ये देशातील जवळपास 50 कोटी नागरिकांचा समोवश होतो.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ 2011 मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेतील ग्रामीण व नागरी भागातील वंचित व व्यवसाय निकषांवर आधारित कुटुंबाना मिळतो. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते.प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत नोंद झालेल्या 83.63 लाख कुटुंबातील सदस्यांना संगणकीकृत ई-कार्ड चा वापर करुन योजनेत सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयात उपचार घेता येतो. महाराष्ट्रात 69.83 लाख ई-कार्ड देण्यात आली आहे.
आयुष्यमान भारत योजनेत 30 हजारांपासून तीन लाखांपर्यतचे उपचार घेता येतात. तर पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळतं. आयुष्यमान भारत ही योजना कागदपत्र विरहित योजना आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उतारा आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं निर्धारित केलेली ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरली जातात.
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ कसा घ्यावा?
या योजनेत रुग्णालयात 3 दिवस अगोदर आणि उपचारानंतरच्या 15 दिवसांची क्लिनिकल ट्रीटमेंट आणि औषधं कवर होतात. या योजनेचा लाभ सूचीबद्ध असलेल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेता येतात. अधिक माहितीसाठी https://pmjay.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ किती आणि कुणाला मिळतो? अर्ज कुठे करायचा?https://t.co/6CXyxz6ROE#MPJAY | #MahatmaPhuleJanArogya | #Maharashtra | #healthcare
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021
संबंधित बातम्या:
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ किती आणि कुणाला मिळतो? अर्ज कुठे करायचा?
Women’s Day Special Video: महिंद्राच्या या जाहिरातीची देशभर चर्चा, आसान होता तो हर कोई किसान होता!
(Aayushyman Bharat Pradhanmantri Jan Aarogya Yojana know details how to apply for scheme)