तब्बल 75 कोटी रुपयांना विकतं विष, ‘या’ देशात सापडतो जगातील सर्वात विषारी विंचू

| Updated on: May 05, 2021 | 7:51 PM

क्युबा येथील विंचवाच्या विषाला तर मोठी मागणी आहे. त्याचे विष तब्बल 75 कोटी रुपयांना विकते. (cuba blue scorpion poison cancer treatment)

तब्बल 75 कोटी रुपयांना विकतं विष, या देशात सापडतो जगातील सर्वात विषारी विंचू
scorpion
Follow us on

मुंबई : आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारचे विषारी आणि घातक असे प्राणी आहेत. या प्राण्यांच्या चावण्यामुळे, दंशामुळे किंवा त्यांच्या संपर्कात आल्यानंतर माणसाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. विषारी प्राण्यांचा विषय निघाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्यासमोर साप उभा राहतो. मात्र, सापासोबतच विंचू हा सुद्धा असाच एक विषारी प्राणी आहे, ज्याच्या दंशामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. क्युबा येथील विंचवाच्या विषाला तर मोठी मागणी आहे. त्याचे विष तब्बल 75 कोटी रुपयांना विकते. (Cuba blue scorpion poison is worlds costly poison sold to treat Cancer)

क्युबा येथे एक विशिष्ट प्रकारचा विंचू सापडतो. हा विंचू निळ्या रंगाचा असून त्याच्या विषाला मोठी किंमत आहे. या विंचवाचे विष तब्बल 75 रुपये प्रतिलिटर दराने विकते. मिळालेल्या माहितीनुसार या निळ्या रंगाच्या विंचवाच्या विषापासून एक औषधी तयार केली जाते. या औषधीचे नाव ‘Vidatox’ असून त्याचा उपयोग कर्करोगावर उपचार करण्यासाठी होतो. या विंचवाचे विष कर्करोगाला मुळापासून नष्ट करतात असे म्हटले जाते. क्युबामध्ये या विंचवाच्या विषाला चमत्कारी विष म्हटलं जातं.

जगातील सर्वात महागडे विष

क्युबा येथे आढळणाऱ्या या निळ्या विंचवाच्या विषाला मोठी मागणी आहे. तसेच हे विष जगातील सर्वात महाग विष असून ते 75 कोटी रुपये प्रतिलिटर या दराने विकते. त्यानंतर किंग कोब्रा जातीच्या सापाचे विष हे 30.3 कोटी रुपये प्रतिलिटर दराने विकते. मिळालेल्या माहितीनुसार क्युबा येथे आढळणाऱ्या निळ्या विंचवाचे विष थायलंड येथील किंग कोब्राच्या विषापेक्षाही महाग आहे.

पेनकिलर म्हणून उपयोग

इस्त्रायलच्या तेल अविव विद्यापीठ (Tel Aviv University)चे प्रोफेसर मायकल गुरेवटिज यांनी दिलेल्या माहितीनुसार क्युबातील विंचवाच्या विषाचा उपयोग आरोग्यविषयक संशोधन आणि उपचारासाठी केला जातो. तसेच या विंचवाच्या विषामध्ये पेनकीलर म्हणून काम करणारे तत्व आढळतात. त्याबरोबरच क्युबातील विंचवाचे विष शरीरातील कॅन्सर थोपवण्यासाठी वापरले जाते.

दरम्यान, विंचवाचे विष फक्त कॅन्सरवर उपचारासाठीच नव्हे तर अन्य अनेक आजारांवर गुणकारी असल्याचा दावा केला जातो. मात्र, अन्य कोणत्या आजारांवर उपचार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

इतर बातम्या :

Video | महागडी दारु, खमंग चकणा, महिलांच्या ‘ओल्या पार्टीची’ थेट आयपीएस अधिकाऱ्याकडून दखल, व्हिडीओ व्हायरल

Video | इंजेक्शनची सुई पाहून तरुणीला फुटला घाम, नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !

Video | जीव वाचवण्यासाठी आईला तोंडावाटे श्वास, मुलीकडून जीवाच्या आकांताने प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

(Cuba blue scorpion poison is worlds costly poison sold to treat Cancer)