Digital Voter ID Card: डिजीटल वोटर कार्ड कसं डाऊनलोड करायचं? वाचा सोप्या टिप्स

| Updated on: Mar 23, 2021 | 1:51 PM

डिजीटल मतदान ओळखपत्र (Digital Voter Card) डाऊनलोड करण्याची सुविधा जानेवारीमध्ये सुरु झाली आहे. Digital Voter id download

Digital Voter ID Card: डिजीटल वोटर कार्ड कसं डाऊनलोड करायचं? वाचा सोप्या टिप्स
डिजीटल वोटर कार्ड
Follow us on

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) डिजीटल मतदान ओळखपत्र (Digital Voter Card) डाऊनलोड करण्याची सुविधा जानेवारीमध्ये सुरु केली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदार आपले व्होटर कार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येतं. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवसादिवशी ही सुविधा सुरु करण्यात आली. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये डिजीटल वोटर आयडी वापरता येणार आहे. (Digital Voter id know how to download form website of Election Commission)

मोबाईल नंबर अपडेट असणं आवश्यक

ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला असेल, त्यांना डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. ज्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही, त्यांना तो निवडणूक आयोगाकडून मोबाईल नंबर पडताळणी करुन घ्यावा लागणार आहे.

पीडीएफ स्वरुपात डिजीटल वोटर कार्ड

सर्व मतदारांना डिजीटल कार्ड पीडीएफ स्वरुपात मिळेल. नव्या मतदारांना दोन्ही स्वरुपातील मतदान कार्ड मिळणार आहे. मतदार आपले डिजीटल वोटर कार्ड डिजीलॉकर (Digilocker) मध्येही सेव्ह करुन ठेवू शकतात.

डिजीटल वोटर कार्ड डाऊनलोड कसं करायचं?

डिजीटल वोटर कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम http://voterportal.eci.gov.in/ या वेबसाईटवर भेट द्या, तिथे तुमचं अकाऊंटला बनवा. त्यानंतर लॉगीन करुन वेबसाईटवरील e-pic चा पर्याय निवडा. त्यानंतर तुमचा मतदार क्रमांक टाका. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP फोनवर येईल. ओटीपी वेबसाईटवर नोंदवा त्यानंतर तुम्ही डिजीटल मतदार कार्ड डाऊलोड करु शखता.

केवायसी का करावी लागते?

ज्या मतदारांचे मोबाईल नंबर निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डमध्ये वेगळे असतील आणि सध्या ते दुसरा क्रमांक वापरत असतील तर अशावेळी केवायसी प्रक्रिया निवडावी लागते. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही मोबाईलनंबर अपडेट करु शकता. त्यानंतर डिजीटल मतदार कार्ड डाऊलोड करु शकता.डिजीटल वोटर कार्ड वारंवार बनवण्याची गरज राहणार नाही.

संबंधित बातम्या:
डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

डिजीटल मतदान ओळखपत्राची प्रतीक्षा संपली, Voter ID कसं डाऊनलोड करणार?

(Digital Voter id know how to download form website of Election Commission)