‘या’ देशात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी आहे; इस्लामबद्दल एक शब्द बोलल्यासही मृत्यू होऊ शकतो

| Updated on: Dec 07, 2024 | 1:41 PM

या जगात असाही एक देश आहे जिथे मुस्लिमांच्या प्रवेशावर थेट बंदी घालण्यात आली आहे. एवढंच नाही तर इस्लामबद्दल कोणतीही चर्चा केली तर थेट त्याल व्यक्तीला मृत्यूदंडही देण्यात येऊ शकतो. असा कोणता देश आहे जिथे एवढे कडक कायदे बनवण्यात आले आहेत?

या देशात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी आहे; इस्लामबद्दल एक शब्द बोलल्यासही मृत्यू होऊ शकतो
Follow us on

प्रत्येक देशाचे काही नियम आणि कायदे असतात. पण काही देशांचे नियम हे समजण्यापलिकडचे असतात. जसं की एका देशात चक्क मुस्लिम बांधवांच्या प्रवेशावर तसेच इस्लामबद्दल काहीही बोलण्यास बंदी आहे. या देशात तब्बल पूर्वीपासून राहणारा 3000 पेक्षा जास्त मुस्लिम समाज आहे. मात्र त्यांनाही या देशाच्या नियमाप्रमाणे इस्लामबद्दल एकही शब्द बोलण्यास मनाई आहे.

इथे मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी

इस्लाम हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे, ज्याचे जगभरात दोन अब्जाहून अधिक अनुयायी आहेत. हा ख्रिश्चन धर्मानंतरचा दुसरा सर्वात मोठा धर्म आहे आणि मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये त्याची लक्षणीय उपस्थिती आहे. इंडोनेशिया आणि भारतासारख्या देशांमध्ये सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाहायला मिळते. तसेच असेही अनेक देश आहेत जेथे मुस्लिम लोकसंख्या शून्याच्या जवळ आहे आणि यापैकी काही राष्ट्रांमध्ये तर इस्लामवर थेट बंदीच घालण्यात आली आहे.

असाच एक देश म्हणजे उत्तर कोरिया, जो आपला हुकूमशहा किम जोंग-उनमुळे चर्चेत असतो. ते युनायटेड स्टेट्स आणि पाश्चात्य शक्तींना आपले सर्वात मोठे शत्रू मानतात. केवळ 2.6 कोटी लोकसंख्या असूनही, उत्तर कोरिया जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण लष्करी शक्ती म्हणून ओळखला जातो.

उत्तर कोरिया, किम जोंग-उनच्या राजवटीत, परदेशी धर्म विशेषत: इस्लामचे पालन करण्यास कठोरपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे. देश अधिकृतपणे नास्तिक असला तरी, धार्मिक प्रथा सामाजिक गोष्टींना बाधा आणू नये किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू नये, यासाठी इथे इस्लाम धर्माचे पालन करण्यास किंवा नव्यानं मुस्लिम समाजातील नागरिकांना इथे प्रवेश नाकारण्यात आला आहे. तसा कायदाच या देशाने बनवला आहे.

इस्लामबद्दल एक शब्द बोलल्यासही मृत्यूदंड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर कोरियामध्ये सध्या 3,000 च्या जवळपास मुस्लिम आहेत. त्यांच्याकडे पूजेसाठी मशिदी नाहीत. राजधानी प्योंगयांगमधील इराणी दूतावास संकुलात एकमेव मशीद आहे आणि ती प्रामुख्याने दूतावासात राहणाऱ्या इराणी लोकांसाठीच आहे. उत्तर कोरिया आणि इराणमध्ये मजबूत राजनैतिक संबंध आहेत.पण प्रामुख्याने इस्लामबद्दल कोणत्याही प्रकारे बोलण्यासही या देशात बंदी आहे.

नियम मोडला तर अर्थातच हुकूमशहा किम जोंग-उनकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. जी शिक्षी इथे प्रत्येला कोणताही नियम मोडल्यास भोगावी लागते ती म्हणजे मृत्यदंड. असं म्हटंल जातं की उत्तर कोरियामध्ये इस्लामबद्दल कोणतीही चर्चा झाल्यास किंवा केल्यास त्या व्यक्तीला थेट मृत्यूलाही सामोर जावं लागू शकतं.

इतर धर्माचे पालन करण्यास परवानगी पण नियम व अटी लागू

बहुसंख्य लोकसंख्या कोरियन शमानिझम आणि चॉन्ग्रिओनिझम, देशाच्या पारंपारिक विचारसरणीचे अनुसरण करते, ज्याचा किम जोंग-उनच्या सरकारद्वारे सक्रियपणे प्रचार केला जातो. तेथील लोकसंख्यामध्ये एक छोटासा भाग बौद्ध आणि ख्रिश्चन धर्माचे देखील पालन करणारा देखील आहे.

एका रिपोर्टनुसार उत्तर कोरिया हा नास्तिक देश मानला जातो. जो तेथील नागरिकांना कोणत्याही धर्माचे पालन करण्यास परवानगी आहे पण या अटींसह परवानगी दिली जाते की, धार्मिक विश्वासांनी देश, समाज किंवा सामाजिक व्यवस्थेत कोणताही व्यत्यय येता कामा नये.