मुंबई : 8 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन विक सुरू होणार आहे त्यामुळे प्रत्येकजण या आठवड्यात आपल्या जोडीदाराला विविध प्रकारच्या भेटवस्तू देण्यासाठी तयार आहेत. भेटवस्तूसुद्धा अनेक प्रकारच्या असतात. काही लवकर संपणाऱ्या तर काही दीर्घकाळ टिकणाऱ्या. आज आम्ही तुम्हाला अशा एका भेटवस्तूबद्दल सांगतोय जी वस्तू वर्षानुवर्ष तुमच्या सोबत राहू शकते.
टपाल तिकीट, हो टपाल तिकीट आतापर्यंत तुम्ही टपालाचं तिकीट एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा विशिष्ट ठिकाणाच्या सन्मानार्थ लाँच झालेलं पाहीलं असेल. मात्र आता टपाल तिकिटावर तुमचा फोटो किंवा तुमच्या खास व्यक्तीचा फोटो छापून तुम्ही कोणालाही आनंदी करू शकता.
2011 मध्ये या योजनेला सुरुवात
2011 मध्ये भारत सरकारनं ही योजना सुरू केली होती. या योजनेला ‘माय स्टॅंप’ असं नाव देण्यात आलं. 10 वर्षांपूर्वी आलेल्या या योजनेंतर्गत कोणताही सामान्य माणूस टपाल तिकिटावर आपला फोटो छापू शकतो.
टपाल तिकीट संकलनाची आवड असणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही गोष्ट विशेष असू शकते. आजही या योजनेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे आणि यामुळे फार कमी लोक आतापर्यंत टपाल तिकिटावर आपला फोटो पोस्ट करतात.
जाणून घ्या प्रक्रिया
वर्ल्ड फिलिटेली एक्झीबिशन दरम्यान सरकारनं 10 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, फक्त 300 रुपये शुल्क देऊन तुम्ही तुमचा फोटो असलेलं 12 टपाल तिकिटं मिळवू शकता. इतकंच नाही तर आपल्या फोटोसोबतचं हे टपाल तिकीट इतर डाक तिकिटाप्रमाणे वैध असेल. या तिकीटामार्फत तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोस्ट देखील पाठवू शकता.
तुमचा फोटो असलेल्या टपाल तिकिटासाठी तुम्हाला तुमच्या शहरातील पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा लागेल. फोटो असलेली टपाल तिकिटं काढण्यासाठी, ज्या व्यक्तीचा फोटो तुम्हाला टपाल तिकिटावर पाहिजे तो व्यक्ती जिवंत असणं आवश्यक आहे.
यानंतर, तुम्हाला मिळालेलं हे टपाल तिकीट, तुम्ही लग्न, वाढदिवस, भेटवस्तू यासाठी वापरू शकता.
संबंधित बातम्या
Valentines Week 2021 | ‘इज़हार-ए-इश्क’ करण्यापूर्वी जाणून घ्या गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ…
Photo : श्रुती मराठेच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो