मुंबई : कोरोना विषाणू आल्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला (Viral Photo Groom Using Computer And Bride Waiting For Him). त्यामुळे जास्तकरुन नोकरदार वर्ग हा वर्क फ्रॉम होम करत आहे. वर्क फ्रॉम होम कल्चर सध्या जोरात सुरु आहे. टेक्नोलॉजीने आपले पाय मोठ्या प्रमाणात पसरवले आहेत. आता तर लहान लहान मुलं देखील स्मार्टफोनवरच अभ्यास करत आहेत. वर्क फ्रॉम होम असल्याने नोकदारवर्गाचे कामाचे तास, कामाचं प्रमाण वाढलं आहे आणि कामाची पद्धतही बदलली आहे (Viral Photo Groom Using Computer And Bride Waiting For Him ).
घरुन काम करत असल्याने जास्त वेळ अधिक काम करावं लागतं. तसेच, कामाचा कुठला निश्चित कालावधीही आता राहिलेला नाही. कधीही काम करावं लागू शकतं. याचंच जीवंत उदाहरण म्हणून सध्या एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
“hold on babe let me check my twitter notifications first” pic.twitter.com/Fz9qjDrKj9
— paneer (@albertkamuh) February 9, 2021
नवविवाहित जोडप्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालतो आहे. यामध्ये लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरदेव हा कामावर बसलेला दिसत आहे. तर तर नववधू ही पलंगावर बसून नवरदेवाची वाट बघताना दिसत आहे. या दोघांनी लग्नाचेच कपडे घातलेले आहेत.
Hold on babe, can you believe Kangana just compared herself to Meryl Streep! pic.twitter.com/VrfZKQBLlm
— Prashant (@prshnt_here) February 9, 2021
इंडिया टाईम्सनुसार, हा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये या जोडप्याचं आताच लग्न झालं आहे. इतकंच नाही तर त्यांनी अद्याप कपडेही बदललेले नाहीत. नववधू नवरदेवाची वाट बघते आहे. पण, नवरदेव पहिले कम्प्युटरवर त्याचं काम करतो आहे. पण, हा फोटो कुठला आहे याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही. पण, या फोटोमुळे सध्याच्या परिस्थितीचं नेमकं चित्र स्पष्ट झालं आहे.
“hold on babe let me check my twitter notifications first” pic.twitter.com/Fz9qjDrKj9
— paneer (@albertkamuh) February 9, 2021
सोशल मीडियावर लोकांनी या फोटोवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर काहींनी सध्याच्या परिस्थितीत किती समस्या उद्भवते आहे यावर चिंता व्यक्त केली.
Viral Photo Groom Using Computer And Bride Waiting For Him
संबंधित बातम्या :
लग्नाच्या आश्वासनापासून सावध, पुण्यात बनावट लग्न लावणारी टोळी गजाआड, 9 महिलांचा समावेश
VIRAL VIDEO | नवरीचा ‘क्लोजअप’ फोटो काढायला गेला अन्…., नवरीच्या रिॲक्शनवर नेटिझन्स फिदा
Fact Check : फोटोग्राफरनं नवरीला टच केलं, नवऱ्यानं कानाखाली ठेवली, खरंच असं घडलं?