वाशिम: राज्यात सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियान राबवलं जाते. कोट्यवधी रुपये शिक्षणावर खर्च केले जात आहेत. तरीही अजून अनेक मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. मात्र, वाशिम पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले यांनी सामाजिक जाणिवेतून भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना मोफत ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे. भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्तव्यापलीकडे जाऊन ज्ञानदानाचे पवित्र काम त्या करत आहेत.त्यांमुळं या पालावरील मुलांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य दिसून येत आहे. (Washim Police Constable Sangeeta Dhole teach the children’s from lockdown)
वाशिम शहरालगत पोटासाठी भटकंती करणाऱ्या समाजातील लोकांनी पाल टाकले आहेत. लॉकडाऊन दरम्यान संगीता यांची जवळच असलेल्या चेकपोस्टवर ड्युटी लागली. येता-जाता त्या पालावरील मुलांना बघत. संगीता यांनी या मुलांना एकत्र करून त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण केली. कर्तव्याबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी स्वखर्चाने मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. लॉकडाऊन लागल्यापासून संगीता ढोले प्रवास प्रकाशाकडे या उपक्रमांतर्गत ज्ञानदानाचं काम करत आहेत. शिक्षणाला वाघिणीचे दुध म्हटले जाते. शिक्षण मिळाले की, व्यक्तीची, त्याच्या कुटुंबाची व समाजाची प्रगती होते. मात्र, आजही आपल्या देशातील अनेक घटक शिक्षणापासून वंचित आहेत. सामाजिक जबाबदारीचे भान असल्यानं मुलांना शिकवण्याचं काम करते, असं संगीता ढोले सांगतात.
समाजातील प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही भटकंती करणाऱ्या समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूरच असल्याचे पहायला मिळते. या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील एक आधुनिक सावित्री धडपड करत आहे. संगीता ढोले असे त्यांचे नाव असून त्या वाशिम पोलीस दलात कार्यरत आहेत. संगीता ढोले यांच्या प्रयत्नामुळे पालावर गेल्या वर्षभरापासून बाराखडीचा आवाज घुमत आहे. शिक्षण मिळाल्याने मुलांना अक्षराची, एबीसीडीची ओळख झाली. आता ही मुले शिकून मोठ्या नोकरीवर जाण्याची स्वप्न बघत आहेत. तर पालकांनाही आपल्या पाठीशी कुणीतरी असल्याचा आनंद आहे. मुलांना शिक्षण मिळाल्याने समाज सुधारेल, अशी आशा पालकांना आहे.
Women’s Day Special Video: महिंद्राच्या या जाहिरातीची देशभर चर्चा, आसान होता तो हर कोई किसान होता!https://t.co/TWJY5ONnQt#Internationalwomenday | #Mahindra | #MahindraTractors | #WomenDay
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 7, 2021
संबंधित बातम्या:
Women’s Day Special Video: महिंद्राच्या या जाहिरातीची देशभर चर्चा, आसान होता तो हर कोई किसान होता!
लोकचळवळ : सावित्रीबाईंच्या जयंतीला उत्सवाचं रुप देणारी चळवळ, काय आहे इतिहास?
(Washim Police Constable Sangeeta Dhole teach the children’s from lockdown)