उद्याचा दिवस सव्वातेरा तासांचा; जाणून घ्या नेमके कारण

| Updated on: Jun 20, 2022 | 9:21 AM

उद्या वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे ( longest day of the year). 21 जूनला सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे आजचा हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असेल. उद्या सामान्यपणे दिवसातील  24 तासांपैकी 13 तासांहून अधिक काळ दिवस असतो. उद्या सूर्योदय 5.42 वाजता होणार असून सूर्यास्त 6.49 मिनिटांनी होणार आहे. म्हणूनच […]

उद्याचा दिवस सव्वातेरा तासांचा; जाणून घ्या नेमके कारण
Follow us on

उद्या वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे ( longest day of the year). 21 जूनला सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे आजचा हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असेल. उद्या सामान्यपणे दिवसातील  24 तासांपैकी 13 तासांहून अधिक काळ दिवस असतो. उद्या सूर्योदय 5.42 वाजता होणार असून सूर्यास्त 6.49 मिनिटांनी होणार आहे. म्हणूनच उद्याचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असणार आहे.  उद्यापासून उत्तरायण संपून दक्षिणायण सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. 21 जून हा दिवस जगभरामध्ये जागतिक योगदिन (international yoga day 2022) म्हणून साजरा केला जातो.  21 जून हा सर्वात मोठा दिवस असला तरी प्रत्येक देशात किती तास सूर्यप्रकाश असणार याची गणितं वेगळी असतात. काही ठिकाणी 13 तासांहूनही अधिक काळ सूर्यप्रकाश असतो. या दिवसाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, याच दिवसापासून दक्षिण गोलार्धातील बऱ्याच देशांमध्ये हिवाळ्याची सुरुवात होते. तर काही देशांत उन्हाळा सुरु होतो.

काही देशांत 21 जून हा दिवस एखाद्या सणासारखा देखील साजरा केला जातो. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी प्रति तास वेगाने सुमारे 89 कोटी 40 लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील 21 जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस 22 डिसेंबर असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असते.

हे सुद्धा वाचा