हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग हे जग प्रसिद्ध आहे. येथील कला कौशल्य, प्राचीन असून पुरातत्व हेमाडपंथी मंदिर हे मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून जगप्रसिद्ध आहे. मंदिरावर नक्षीदार कोरीव काम आणि छटा जगभरातील भाविकांना आकर्षित करतात.
जगभरातुन श्रावण महिन्याच्या सोमवारी भाविक लाखोच्या संख्येने श्री नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मंदिर बंद असल्याने भाविकांविना मंदिर ओस पडली आहेत.
हे उंच शिखर आहे. औंढा नागनाथ येथील जोतिर्लिंग शंकराचं येथील मंदिर हे पाच हजार वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगितलं जातंय. संपूर्ण मंदिर, काळ्या दगडात कोरले असून यावर, हत्ती, घोडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे कोरीव काम केल्याच दिसून येते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी, मुख्य तीन दरवाजे असून मंदिराचा मुख्य भाग भूगर्भात आहे.
भूगर्भात प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड दिसते. ही पिंड महादेव आणि श्री विष्णू देवाची असल्याचे मानल्या जाते. त्यामुळे नागनाथला हरिहर या नावानेही ओळखलं जाते. त्यामुळे येथे पिंडीला दुर्वा, बेल, फुले, नारळाची आरास वाहिली जाते. श्रावण महिन्यात प्रभू शंकराचं दर्शन घेतल्याने भविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात अशी मान्यता आहे.
या मंदिराची उंची 100 फूट एवढी असून मंदिराला कुठलाही पाया नसून जमीनीच्या पृष्ठ भागावर या मंदिराची रचना केली केली आहे. तर संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या काळात संत नामदेव महाराज कीर्तन करत असतांना मंदिराने आपली जागा बदलली असल्याचा येथील भाविकांचा समज आहे.
बाहेरुन मंदिराचे दोन भाग पाहायला मिळतात पूर्वी मोघल साम्राज्यात येथील मंदिराचा काही भाग मोघलांनी पाडला असल्याचं सांगितलं जाते. यानंतरच्या काळात आहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करुन मंदिराच्या कळसाची स्थापना केली असल्याचं इतिहासात नोंद आहे. म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून भाविक येथे येतात.
कोरोनामुळे बंद असलेले मंदिर आता चालू करण्याची मागणी भविक करत आहेत.
5 श्रावणी सोमवार, महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग : ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानाची माहिती जाणून घ्याhttps://t.co/eJX3dTOPV7#ShravanMonth #ShravanSomvar #Mahadev #jyotirlinga #TrimbakeshwarShivaTemple
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 23, 2021
संबंधित बातम्या :