आषाढ महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आज 28 जूनला आषाढ अमावास्या (aashadh amawashya 2022) आहे. अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. आषाढ अमावास्येला हलाहरी अमावस्या (halhari amawasya 2022) देखील म्हणतात, जो शेतीशी संबंधित आहे, तर उद्या बुधवारी, 29 जून रोजी स्नान-दान अमावस्या असेल. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून गरजूंना दान केल्याने शुभ फळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू मान्यतेनुसार अमावस्येला नऊ ग्रहांपैकी एक असलेल्या चंद्राची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. या वर्षी आषाढ महिन्यातील अमावस्या तिथी मंगळवार 28 जून रोजी 05:53 पासून सुरू होईल आणि बुधवार, 29 जून रोजी सकाळी 08:23 पर्यंत राहील.
हिंदू दिनदर्शिकेनुसार, आज हलाहरी अमावस्या देखील आहे. या दिवशी शेतीच्या सर्व साधनांची पूजा केली जाते. त्यामुळेच आषाढ महिन्यातील अमावास्येला हलहरी अमावस्या म्हणतात. हलहरी अमावस्येच्या दिवशी रोप लावल्याने पितरांची प्राप्ती होते आणि घरात सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक मान्यता आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये या दिवशी पितृ तर्पणचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे, ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष आहे त्यांनी आषाढ अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय किंवा श्राद्ध केल्यास त्यांच्या समस्या दूर होऊ शकतात.
हिंदू दिनदर्शिकेनुसार 29 जून रोजी स्नान-दान अमावस्या आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आहे, जर तुमच्या घराजवळ नदी नसेल तर घरातील कोणत्याही पवित्र नदीचे पाणी मिसळून स्नान करावे. आंघोळीनंतर सूर्यदेवाला नमन करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा आणि तांब्याच्या पात्राने सूर्याला अर्घ्य द्यावे. यासोबतच अन्नधान्य, वस्त्र, भांडी इत्यादींचे दान करावे. गाईंना हिरवा चारा द्यावा आणि माशांसाठी पिठाचे गोळे तलावात किंवा नदीत टाकावेत. या उपायाने जी नकारात्मक ऊर्जा तुमच्या कामामध्ये बाधा घालत आहे, ती दूर होईल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)